Teaser Poster of upcoming movie Tattaad

Tattaad teaser poster

 

‘तत्ताड’ या आगामी चित्रपटाचं टीझर पोस्टर नुकतेच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं. राहुल गौतम ओव्हाळ ‘तत्ताड’ या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक आहेत. या चित्रपटातून आपल्याला एका वादकाची कथा पहायला मिळणार आहे. हे पोस्टर अत्यंत लक्षवेधी असून या चित्रपटाची कथा नक्की काय असेल असा प्रश्न सर्व प्रेक्षकांना नक्कीच पडला असेल.

 

‘तत्ताड’ या चित्रपटाची निर्मिती चंद्रभागा प्रॉडक्शन्स आणि डीके फिल्म्स एंटरटेन्मेंट चे जीवन जाधव, प्रितम म्हेत्रे आणि डीके चेतन यांनी एकत्रिपणे केली आहे. तसेच अमित माने चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. या चित्रपटातील संगीत रोहित नागभिडे, ऐश्वर्य मालगावे यांनी केले असून संजय नवगिरे, राहुल बेलापूरकर यांनी गीतलेखन केलं आहे.

 

‘तत्ताड’ या चित्रपटाच्या टीझर पोस्टरमध्ये आपल्याला गडद रंगाच्या पार्श्वभूमीवर हाती क्लॅरोनेट असलेला वादक पहायला मिळत आहे. या तेअसेर पोस्टर वारीन या चित्रपटाच्या केंद्रस्थानी वादक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या चित्रपटातील कलाकारांची माहिती देखील गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. असे असेल तर ‘तत्ताड’ चित्रपटाच्या लक्षवेधी पोस्टरमुळे चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे