Teaser of the most awaited movie ‘Ubuntu’ released now

Ubuntu teaser 01

 

सध्या मराठी चित्रपटातील अभिनेते दिग्दर्शनाचा प्रयत्न करत आहेत आणि दिग्दर्शक अभिनयाचा हे आपण पहिले. आसच एक यशस्वी प्रयत्न आपण प्रसाद ओकच्या ”कच्चा लिंबू” या चित्रपटामध्ये मध्ये पाहिलंच.आता या पाठोपाठ प्रसादचा अगदी जवळचा मित्र आणि अभिनेता पुष्कर श्रोत्री देखील दिग्दर्शनाकडे वळला आहे. ‘उबुंटू’ हा पुष्कर श्रोत्री दिग्दर्शित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत आहे.

 

पुष्कर श्रोत्री दिग्दर्शित ‘उबुंटू’ या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये भरपूर उत्सुकता दिसत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमुळे प्रेक्षकांना आता ‘उबुंटू’ या चित्रपटाची एक छोटीशी झलक त्यांना पाहायला मिळणार आहे. या टीझरमध्ये शाळा आणि त्याभोवताली घडणारे प्रसंग पाहायला मिळतील.

 

उबुंटू हा चित्रपट स्वरुप रिक्रिशन अँड मीडिया प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत आणि फेबल फॅक्टरी यांची निर्मिती आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची दिग्दर्शन, निर्मिती आणि लेखनाची जबाबदारी पुष्कर श्रोत्रीने पार पडली आहे. तसेच या चित्रपटाचे संगीतकार श्रीरंग गोडबोले आणि समीर सामंत हे आहेत तर कौशल इनामदार यांनी संगीत दिले आहे. उबुंटू हा चित्रपट येत्या १५ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

 

‘उबुंटू’ या चित्रपटाची एक छोटीशी झलक नक्की पहा :