‘Take Care Good Night’ upcoming movie based on true events.

नुकताच ‘टेक केअर गुड नाइट’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. सायबर क्राइमवर भाष्य करणारा हा चित्रपट असून यामध्ये सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, इरावती हर्षे, आदिनाथ कोठारे आणि पर्ण पेठे यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा एका शहरातील कुटुंबाची असून त्यांचे स्थैर्य आणि सन्मान यासाठी त्यानि एका सायबर गुन्हेगाराविरोधात दिलेला लढा या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. ‘टेक केअर गुड नाइट’ हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे.

 

शहरातील या कुटुंबाला अनेक विकट समस्यांना सामोरे जावे लागते. या चित्रपटात सचिन खेडेकर हे वडिलांची भूमिका साकारत असून बदलत्या तंत्रज्ञानाचे धडे घेत तंत्रज्ञानाबद्दलचे त्यांचे अज्ञान दूर करून घ्यावे लागते.इरावती हर्षे या आई ची भूमिका साकारत असून ती तिच्या समुपदेशन कौशल्याचा योग्य वापर कार्यांचा प्रयत्न करत आहे. तसेच पर्ण पेठे हि या दोघांच्या मुलीची भूमिका साकारत असून आपल्या आई वडीलांबरोबरचा संवादाचा तुटलेला धागा पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करीत आहे. आजच्या तंत्रज्ञानाने व्यापलेल्या जीवनशैलीचे अनेक पैलूही व त्यामुळे होणाऱ्या धोकादायक घटना कथेतून पुढे उलगडत जातात.

 

गिरीश जयंत जोशी यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती हिमांशू केसरी पाटील आणि महेश मांजरेकर यांनी केली आहे . नरेंद्र भिडे यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे. ‘टेक केअर गुड नाईट’ चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात ३१ ऑगस्ट २०१८ रोजी प्रदर्शित होणार आहे.

 

नक्की पहा या चित्रपटाचा ट्रेलर :