Suyog Gorhe will play lead role in Hemant Dhome’s ‘Satarcha Salman’

Hemant Dhome 01

 

चित्रपटसृष्टीच्या मायानगरीची भुरळ अगदी लहाना पासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच असते. या चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांना लोक आपले आयडॉल मानतात. चित्रपट सृष्टीतील कलाकारणविषयी सामान्य लोकांना विशेष आकर्षण असते तसेच या कलाकारांना ते सोशल मीडियावर सतत फॉलो करतात. अनेकदा बोलताना आपण लोकांना विशिष्ट कलाकारांच्या नावाची ओळख द्यायला लागतो जसे, अहमदनगरचा अनिल कपूर, शहापूरचा शाहरुख, नाशिकचा नागार्जून, बदलापूरचा बच्चन, मालेगावची माधुरी, तसाच हा आहे सातारचा सलमान !!

 

hemant dhome 02

 

असाच एक वेगळा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीसाठी येत असून ‘सातारचा सलमान’ असे या चित्रपटाचे शीर्षक आहे. या चित्रपटाची गोष्ट आहे एका छोट्या गावात राहणाऱ्या अमित काळभोर या सामान्य मुलाच्या स्वप्नांची आणि जिद्दीची आहे. ‘सातारचा सलमान’ या सिनेमातून छोट्या गावात राहूनही मोठे स्वप्न पाहणारा अमित आपल्या सगळ्यांच्याच भेटीला येत आहे. हेमंत ढोमे हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून टेक्सास स्टुडियोजचे प्रकाश सिंघी या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.‘सातारचा सलमान’ हा चित्रपट ११ ऑक्टोबर २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी सिनेसृष्टीला ‘बघतोस काय मुजरा कर’, ‘ये रे ये रे पैसा २’ असे सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सातारचा सलमान’ या चित्रपटातही काहीतरी धमाल आणि नाविन्यपूर्ण पाहायला मिळेल. यासोबतच ‘सातारचा सलमान’ या चित्रपटाच्या लेखनाची धुरा देखील त्यानेच सांभाळली आहे.

 

hemant dhome 03

 

‘सातारचा सलमान’ या चित्रपटाचे पोस्टर नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आले. हा चित्रपट हेमंत त्याच्या मागील चित्रपटाप्रमाणेच यावेळीही प्रेक्षकांसाठी एक मजेशीर मेजवानी असेल हे नक्की. ‘सातारचा सलमान’ मधील ‘सलमान’ हि भूमिका सुयोग गोऱ्हे साकारत आहे. सुयोग या सिनेमात अमित काळभोर ही व्यक्तिरेखा साकारत असून अमितला त्याच्या गावाने ‘साताऱ्याचा सलमान’ ही हटके ओळख दिली आहे. अमितला ही ओळख का आणि कशी दिली यासाठी सातारचा सलमान हा चित्रपट पाहावा लागेल.