Sunny Leone is super excited to watch this Marathi movie

Sunny Leone likes mala kahich problem nahi trailer 02

‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी मुंबईत लाँच करण्यात आला. या चित्रपटाचे निर्माते पी. एस. छतवाल, रिचा सिन्हा आणि रवि सिंग तर दिग्दर्शक समीर विद्वांसबरोबरच चित्रपटातील कलाकार स्पृहा जोशी, गश्मीर महाजनी, कमलेश सावंत, सीमा देशमुख, मास्टर आरश गोडबोले, करण भोसले आणि पटकथा संवाद लेखक कौस्तुभ सावरकर यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ चित्रपट टॉर्क फार्मा प्रस्तुत आणि फिल्मी किडा प्रोडक्शन्स निर्मिती आहे.

 

या चित्रपटाच्या निमित्ताने सतत मला काहीच प्रॉब्लेम नाही म्हणत आपल्या प्रॉब्लेम्सकडे दुर्लक्ष करणाऱ्या तरूणाईचे प्रॉब्लेम्स आणि त्यावर कसा तोडगा ही तरूणाई काढू शकते याचं चित्रण मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला सोशल मीडिया वर भरपूर पसंती मिळताना दिसत आहे. प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयी उत्सुकता आहे. विशेष मन्हजे खुद्द सनी लिऑन ने देखील हा ट्रेलर बघून ट्विटर वर ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ चित्रपटाबद्दल ट्विट केलेलं आहे.

 

Sunny Leone likes mala kahich problem nahi trailer 01

 

तिने केलेल्या ट्विट मध्ये असे म्हटलं आहे कि “आत्ताच मी ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ मुव्हीचा ट्रेलर बघितला. आणि मुव्ही बघण्यासाठी मी खूप उत्सुक आहे”. या वरून सनी लिऑन हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहे हे समजते. नातं म्हणजे अनेकांना जोडणारा एक रेशमी धागा असतो.अशा ह्या प्रेमळ नात्याच्या रेशमी बंधात स्वतःला बांधून घेत येत्या ११ ऑगस्टला नक्की पहा ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात.