Subodh Bhave’s upcoming movie ‘Chhanda Priticha’

Chhanda Priticha 01

धकाधकीच्या जीवनातून थोडा विरंगुळा म्हणून एखादा छंद प्रत्येकाने जोपासावा असं म्हटलं जातं. आपण पाहतो प्रत्येक माणसाला जीवनात काही ना काही छंद असतो. काही लोक आवड म्हणून नाणी-नोटा जमा करतात तर कुणी शिंपले गोळा करतात आणि काही लोक पोस्टाची तिकीटं गोळा करतात . असे अनेक नाना छंद लोकांना असतात. हे छंद माणसाला एक वेगळा आनंद देऊन जातात… मात्र ज्यांना प्रितीचा छंद प्रितीचा छंद जडतो त्यांचं काय? याच विषयावर आधारित एक चित्रपट लवकरच तुमच्यासमोर येत आहे. या चित्रपटाचे नाव छंद प्रितीचा असं आहे.

 

Chhanda Priticha 02

 

प्रितीचा छंद लागलेल्या अशाच दोन जीवांची कथा सांगणारा नवा चित्रपटात मराठीत येत आहे. ‘छंद प्रितीचा’ या चित्रपटाचं नुकतंच पोस्टर लाँच करण्यात आलं. या चित्रपटाचं पोस्टर पाहिलं की ‘पिंजरा’, ‘सांगत्ये ऐका’ सारख्या चित्रपटांची आठवण होते. तमाशावर आधारित गावापासून ते शहरी माणसांपर्यंत सर्वांचे मनोरंजन करणाऱ्या या चित्रपटात सुबोध भावे, सुवर्णा काळे यांच्याबरोबरच नवा चेहरा हर्ष कुलकर्णी प्रमुख भूमिकेत दिसणार असून त्यांच्या जोडीला शरद पोंक्षे, विकास समुद्रे, सुहासिनी देशपांडे, गणेश यादव ही कलाकार मंडळी आहेत.

 

या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन एन. रेळेकर यांनी केलं असून चित्रपटनिर्मिती चंद्रकांत जाधव यांनी केली आहे. छायाचित्रदिग्दर्शन जितेंद्र आचरेकर यांचं असून संगीत दिग्दर्शन प्रविण कुंवर यांनी केलं आहे. प्रेमला पिक्चर्स निर्मित ‘छंद प्रितीचा’ हा चित्रपट येत्या १० नोव्हेंबर ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.