Subodh Bhave in upcoming movie ‘Maaza Agadbam’

Majha Agadbam 01

 

‘अगडबम’ हा तब्बल ८ वर्षापूर्वी आलेला चित्रपट तुम्हाला आज हि नक्की आठवत असेल. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अभिनेत्री तृप्ती भोईरचा वेगळा अंदाज प्रेक्षकांना खूप आवडला होता. पुरुषांच्या जंगलात स्वतःचं बाईपण जपणारी व्यक्तीरेखा तिनं साकारली होती. ‘माझा अगडबम’ या चित्रपटात ती पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन कार्यांसाठी सज्ज झाली आहे. अभिनेत्री तृप्ती भोईरने गाजवलेल्या या पात्राचे आजही विशेष कौतुक केले जात असून, ‘माझा अगडबम’ मध्ये ती यापेक्षाही आणखी वेगळ्या दमदार भूमिकेतून लोकांसमोर येत आहे.

 

Majha Agadbam 02

 

 

तृप्ती भोईर या चित्रपटाची प्रमुख नायिका असून लेखिका देखील आहे. तसेच दिग्दर्शिका, निर्माती अशा त्रीसुत्री भूमिकेतही ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. या सिनेमाची पुढील भागाची घोषणा झाल्यापासून, चाहते उत्सुकतेने या भागाच्या प्रतीक्षेत आहेत. तृप्ती गृहिणीची भूमिका साकारत असून तिच्या पतीची भूमिकेत सुबोध भावे झळकणार आहे. या सिनेमाची कथा एक मुलगी, सून, व बायको म्हणून तिच्याकडून असणाऱ्या अपेक्षांना पतीच्या पाठींब्यासह सामोरी जाणाऱ्या नायिकेच्या विविध अडचणी आणि विनोदाची सफर घडवते. एका अलौकिक विनोदाची झालर असणारी ही कथा दिग्दर्शिका तृप्ती भोईर या चित्रपटातून मांडत आहेत.

 

 

Majha Agadbam

 

 

या चित्रपटाचे टीझर पोस्टर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरपोस्टरवर पाठमोरी उभी असलेली एक लढवय्या व्यक्ती आपल्याला पाहायला मिळते आहे. मात्र ही व्यक्ती नेमकी कोण आहे हे समजून येत नसल्यामुळे, हा टीझर पोस्टर रसिकांसाठी उत्सुकतेचा विषय ठरत आहे.सुपरहिट ‘अगडबम’ च्या या दमदार सिक्वेलच्या सादरीकरणाची फळीदेखील तितकीच दमदार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले चित्रपटनिर्माते आणि वितरक जयंतीलाल गडा यांची पेन इंडिया लिमिटेड कंपनी प्रथमच प्रस्तुतकर्त्याच्या भूमिकेद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करीत आहे. शिवाय, टी. सतीश चक्रवर्ती, धवल जयंतीलाल गडा, अक्षय जयंतीलाल गडा यांनी तृप्तीसह सिनेमाच्या निर्मात्यांची धुरा सांभाळली असून, रेश्मा कडाकिया, कुशल कांतीलाल गडा आणि नीरज गाला यांनी सहनिर्मात्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. येत्या २६ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटत आपल्याला अभिनेता सुबोधचा एक नवा अंदाज पाहायला मिळणार आहे.