Subodh Bhave praises John Abraham find out why.

 Savita Damodar Paranjape

 

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम याची पहिली मराठी निर्मिती अर्थात ‘सविता दामोदर परांजपे’ हा चित्रपट उद्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झ्हाला आहे. भय आणि उत्सुकता निर्माण करणाऱ्या चित्रपटात सुबोध भावे, राकेश बापट या कलाकारांसोबतच तृप्ती तोरडमल ही ज्येष्ठ अभिनेते मधुकर तोरडमल यांची कन्या मध्यवर्ती भूमिका साकारत आहेत.

 

SDP 03

 

 

अभिनेता सुबोध भावे यांनी दिलेल्या एका मुलाखतीत सांगतले “ जॉन ‘सविता दामोदर परांजपे’च्या मुहूर्ताला सेटवर आला होता. त्यानंतर त्याने फक्त दोन ते तीन वेळाच सेटवर हजेरी लावली. एकदा सिनेमा दिग्दर्शकाकडे सोपवला की त्यात ढवळाढवळ करायची नसते हे तो चांगलं जाणून आहे आणि यातूनच त्याच्या मनाचा मोठेपणा दिसून आला. त्याने स्वप्नाताईच्या कामात कधीच लुडबूड केली नाही. त्याने त्याला जे वाटतंय ते नक्की सांगितलं आणि फक्त मार्गदर्शन केलं. तसंच सिनेमा एडीट होऊन फायनल झाल्यानंतर त्याने प्रत्येकाला वैयक्तिकरित्या फोन किंवा मेसेज करुन पहिली प्रतिक्रिया दिली.”

 

 

SDP 01

 

जॉन विषयी पुढे बोलताना सुबोध म्हणाले ,जॉन अब्राहम हा खरंच एक गुणी आणि सज्जन माणूस जसा असतो तसाच तो कलावंत आहे. तसेच त्याने सातत्याने उत्तम चित्रपट करावेत, अशी आशा व्यक्त केली. ‘सविता दामोदर परांजपे’ या चित्रपटाची कथा शेखर ताम्हाणे यांची असून लेखन व संवाद शिरीष लाटकर यांचे आहेत. सुबोध भावे, तृप्ती तोरडमल, राकेश बापट यांच्यासोबतच अंगद म्हसकर, पल्लवी पाटील, सविता प्रभुणे आदी कलाकारांच्यासुध्दा सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

स्वप्ना वाघमारे-जोशी दिग्दर्शित आणि ‘जे.ए.एन्टरटेन्मेंट’ आणि ‘पॅनोरमा स्टुडिओज’ प्रस्तुत ‘सविता दामोदर पराजंपे’ हा मराठी सस्पेन्स-थ्रीलर सिनेमा येत्या 31 ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.