Subhash Ghai’s upcoming Marathi movie ‘VIJETA’

Vijeta 03

 

नुकताच विजेता या चित्रपटाचा मुहूर्त पार पडला . विजेता हा आगामी चित्रपट खेळाची पार्श्वभूमी आधारित असून या चित्रपट पोस्टरवरूनच प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच वाढणार हे लक्षांत येतं. गोवा चित्रपट महोत्सवामध्ये या चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले आहे. या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक अमोल शेटगे यांनी केले असून या चित्रपटाची निर्मिती राहुल पुरी, सहनिर्माते सुरेश पै यांनी केली आहे. या चित्रपटाचे छायालेखक उदयसिंह मोहिते असून रोहन – रोहन यांनी या चित्रपटाला संगीत दिलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील वर्षी २४ जानेवारी २०२० रोजी हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा विचार आहे.

 

Vijeta 01

 

सनई चौघडे, वळू आणि राष्टीय पुरस्कार प्राप्त “समिता” या तीन यशस्वी मराठी चित्रपटांच्या निर्मितीनंतर शोमॅन सुभाष घई त्यांच्या मुक्ता आर्टस लि. तर्फे विजेता या नव्या मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. या चित्रपटाचा मुहूर्त खूप थाटामाटात करण्यात आला. सुभाष घई यांनी या चित्रपटाचा मुहूर्ताचा क्लॅप दिला या वेळी त्यांनी या चित्रपटाच्या सर्व कलावंत आणि टिमला शुभेच्छा दिल्या.

 

Vijeta 02

मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामांकित कलावंत या चित्रपटात काम करत आहेत. सुबोध भावे, पूजा सावंत, सुशांत शेलार, माधव देवचके, मानसी कुलकर्णी, देवेन्द्र चौगुले, तन्वी किशोर, कृतिका तुलसकर, प्रीतम कानगे, दिप्ती धोत्रे, गौरीश शिपुरकर, ललित सावंत या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका करीत आहेत.या चित्रपटाचं प्राँडक्शन डिझायनर सुनिल निगवेकर असून जाहिरात संकल्पना साकेत शिकांत यांची आहे.