Spruha Joshi & Mrinal Kulkarni’s upcoming movie ‘Welcome Home’

‘वेलकम होम’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून हा ट्रेलर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ‘घर म्हणजे काय’, ‘आपली माणसं म्हणजे काय’ असे अनेक प्रश्न विचारणारा आणि त्यांची उत्तर देणारा हा चित्रपट आहे. ‘वेलकम होम’ हा चित्रपट १४ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सध्या सगळीकडे या चित्रपटाविषयी चर्चा सुरु आहे.

 

Welcome home 01

 

अभिषेक सुनील फडतरे यांच्या सह विनय बेळे, अश्विनी सिधवानी, दीपक कुमार भगत यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सुमित्रा भावे यांनी या चित्रपटाचं लेखन केलं असून सुनील सुकथनकर यांनी या चित्रपटच दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाचं संगीत पार्थ उमराणी यांनी दिलं असून सुनील सुकथनकर यांनी गीतलेखन केलं आहे.

 

Welcome home 02

 

सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर दिग्दर्शित ‘वेलकम होम’ या सिनेमात स्पृहा जोशी आणि मृणाल कुलकर्णी यांच्यामध्ये बहिणींचं नात बघायला मिळणार आहे. याची बातमी स्पृहाने स्वतः तिच्या इन्स्टा अकाउंटवरून दिली होती. घर या संकल्पनेवर हा चित्रपट बेतला आहे. त्यातही स्त्रीचं स्वतःचं घर कोणतं असा प्रश्न उपस्थित करत त्याचा शोध घेण्यात आला आहे. नेहमीप्रमाणेच सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांचा वेलकम होम हा चित्रपटही चित्रपटप्रेमींच्या नक्कीच पसंतीला उतरेल , यात काहीच शंका नाही.