Have you seen Swapnil Joshi’s latest romantic song

Swapnil Joshi Bhikari 01

 

स्वप्नील जोशी हा मराठी चित्रपटसृष्टीतील रोमँटिक हिरो हिरो आहे. आजपर्यंत अनेक मराठी चित्रपटात त्याच्यावर रोमँटीक गाणी बनवली गेली आहे. आपल्या लाडक्या स्वप्नीला आपण पुन्हा एकदा आपण त्याच्या रोमँटीक अंदाजात पाहणार आहोत. ‘भिकारी’ या स्वप्निलच्या आगामी चित्रपटात ‘ये आता’ हे रोमँटीक साँग तुमच्या भेटीसाठी येत आहे.

 

‘ये आता’ हे रॉमेंटिक गाणे प्रदर्शित झाले असून हे गाणे सध्या खूप गाजत आहे. ‘भिकारी’ हा चित्रपट मी मराठा एंटरटेनमेंटचे शरद देवराम शेलार आणि गणेश आचार्य निर्मित तसेच जीसिम्सचे कार्तिक निशानदार व अर्जुन बरन यांची प्रस्तुती आहे. या गाण्यामध्ये स्वप्नील जोशी सोबत नवोदित अभिनेत्री रुचा इनामदार हे देखील आहे. या गाण्यातील शूटिंग अतिशय उत्तम लोकेशन वर झाली असून गाण्यातील दृश्य पाहणाऱ्यांची डोळे दिपवून टाकत आहे. स्वामी तिन्ही जगाचा…भिकारी’ या सिनेमाच्या प्रत्येक गाण्यात दिग्दर्शक गणेश आचार्य यांचा स्पेशल टच दिसून येत असल्यामुळे, ‘ये आता’ हे प्रेमगीत देखील त्याला अपवाद नाही. महेश लिमये या उत्तम छायाचित्रकाराच्या कॅमेऱ्यातुन हे गाणे चित्रित करण्यात आले आहे. हे गाणे लंडन येथे चित्रित करण्यात आली असून,यात स्वप्नील आणि रुचाची एक वेगळीच कॅमिस्ट्री रसिकांना पाहायला मिळत आहे.

 

‘ये आता’ हे प्रेमगीत गुरु ठाकूर यांनी शब्दबद्ध केले असून या गाण्याला विशाल मिश्रा यांनी संगीत दिले आहे. या गाण्याचे गायक खुद्द विशाल मिश्रा यांनी स्वप्नील चे बोल गेले असून हिंदीची सुप्रसिद्ध गायिका सुनिधी चौहानने रुचाचे बोल गात, हे गाणे अधिकच सुमधुर केले आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना ‘भिकारी’ हा आई आणि मुलाच्या भावनिक नात्यावर भाष्य करणारा हा सिनेमा येत्या ४ ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात स्वप्नील जोशी आणि रुचा इनामदार या जोडीसोबतच कीर्ती आडारकर, गुरु ठाकूर, सयाजी शिंदे, मिलिंद शिंदे आणि प्रदीप काबरा ह्या कलाकारांची देखील महत्वाच्या भूमिका असणार आहे.