Did you see the teaser of the film, titled ‘Girlz’

Girlz 01

 

नुकतंच ‘गर्ल्स’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला यात तिन्ही ‘गर्ल्स’ गुलदस्त्यातून बाहेर आल्या .या चित्रपटात नेमकी त्या काय धमाल करणार याचा अंदाज या चित्रपटाच्या टीझर मधून तुम्हाला आलाच असेल. या टीझर मुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली असून टीझरमध्ये ‘बॉईज’ या अफलातून ‘गर्ल्स’ची ओळख करून देताना दिसत आहेत. मुली काहीच करू शकत नाहीत, असे सांगणाऱ्या या ‘बॉईज’ना या ‘गर्ल्स’ अतिशय चपखल उत्तर देत आहेत. मनमुराद जगणे, राडा घालणे, धमाल-मस्ती करणे एकंदरच लाईफ एन्जॉय करताना त्या दिसत आहेत. सर्व बंधने झुगारून स्वछंदी जगण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे. ‘हम भी किसीसे कम नही’ अशाच काहीशा अंदाजात त्या आपल्याला चित्रपटात दिसणार आहेत.

 

Girlz 02

 

मुलींची मजा मस्ती, त्यांचे गप्पा गोष्टीचे विषय, त्यांची जगण्याची संकल्पना अशा मुलींशी संबंधित बऱ्याच गोष्टी या अनेकदा त्यांच्यापुरताच मर्यादित असतात. या सर्व गोष्टींची कल्पना इतरांना नसल्यामुळे मुली लाईफ एन्जॉय करतच नाहीत, असा अनेकांचा समज असतो. दिग्दर्शक विशाल देवरुखकर यांचा आगामी चित्रपट हाच गैरसमज दूर करण्यासाठी येत असून ‘गर्ल्स’ असे या चित्रपटाचे नाव आहे. मुलींच्या विश्वात नक्की काय घडते? या प्रश्नाचे काहीसे उत्तर या चित्रपटातून सर्वांना मिळणार आहे.

 

 

एव्हरेस्ट एंटरटेनमेंट’, ‘कायरा कुमार क्रिएशन्स’ प्रस्तुत आणि ‘अ कायरा कुमार क्रिएशन्स प्रॉडक्शन’च्या अंतर्गत ‘गर्ल्स’ या चित्रपटाची निर्मिती नरेन कुमार यांनी केली आहे. या चित्रपटाचे लेखन हृषिकेश कोळी यांनी केले असून अमित भानुशाली यांनी सहाय्यक निर्माता म्हणून काम पाहिले आहे. येत्या २९ नोव्हेंबरला हा चित्रपट सर्वत्रप्रदर्षित होत आहे.