Did you see the Official Teaser of ‘Gulabjam’

पदार्थ बनवताना तुमच्या मनातील भावना पदार्थांमध्ये उतरतात. त्यामुळेच एखाद्या पदार्थासाठी असणारे जिन्नस सारखेच असले तरीही प्रत्येकाने बनवलेल्या पदार्थाची चव बदलते. स्वयंपाकशास्त्राचा हा नियम अनेकांना ठाऊक असेल. याच नियमावर आधारित एका चित्रपट बनवण्याचं धाडस दिग्दर्शक सचिन कुंडलकरने केला आहे. ‘गुलाबजाम’ असे या चित्रपटाचे नाव असून लवकरच हा चित्रपट तुमच्या भेटीसाठी येत आहे.

झी स्टुडिओ आणि गो मोशन पिक्चरचा ‘गुलाबजाम’ या चित्रपटामध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर प्रमुख भूमिकेत आहेत. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. हा टीझर सोनाली कुलकर्णी यांच्या आवाजात असून त्यात असे म्हटलंय कि ,” चांगल्या पदार्थाची खूण असते त्याचा वास “.. स्वयंपाक करताना मनातील गोष्ट पदार्थाला कशी सांगायची व त्या गोष्टीचा पदार्थावर कसा परिणाम होतो हे सांगतलं आहे. या टीझर मध्ये आपल्याला पदार्थ दिसत असून एकही कलाकाराचा चेहेरा दिसत नाही.

‘गुलाबजाम’ ही लंडनमध्ये राहणाऱ्या एका मराठी तरुणाची कथा आहे. आदित्य (सिद्धार्थ चांदेकर) हा काही खास मराठी खाद्यपदार्थ शिकण्यासाठी भारतात येतो. भारत भेटीत तो पुण्यात राहणाऱ्या राधाला (सोनाली कुलकर्णी) भेटतो. ती त्याला पारंपरिक मराठी पाककृती शिकवण्याचा निर्णय घेते. इथूनच त्यांच्या सुंदर आणि अर्थपूर्ण मैत्रीची सुरुवात होते. पण मैत्रीचे हे नाते कसे पुढे जाते, त्यात कशी वळणे येतात हे सर्व सांगणारी सुंदर कथा म्हणजे हा चित्रपट आहे, असे कुंडलकर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

पहा या चित्रपटाचा टीझर :