‘Sawdhan Pudhe Gaon Aahe’ movie poster released now.

Sawadhan Pudhe Gaon Aahe 01

 

सावधान पुढे गाव आहे हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झ्हाले असून या पोस्टर वर गिधाडांचे चित्र आहे. असे वेगळे पोस्टर असल्यामुळे या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमधें अधिक उत्सुकता दिसत आहे. चित्रपटाच्या नावावरून हा चित्रपट गावावर आधारित असेल असा अंदाज बंदला जात आहे. आपला देश हा कृषिप्रधान देश आहे आणि सध्या खूप मोठ्या प्रमाणावर शहरीकरण सुरु असताना गाव मात्र आपला वारसा टिकवून आहे.

 

गाव व गावातील शेती हे खऱ्या अर्थानं शहरातील लोकांचे पोट भरते. असे असले तरीही शेतीचा व शेतकऱ्यांना म्हणावा तसा विकास आजही झालेला दिसत नाही. अनेक शेतकरी आजहि त्यांची शेती टिकवण्याचा प्रयत्न करीत आहेत. गावातील हिरवळ आणि मोकळे वातावरण यामुळे आपल्याला प्रसन्न वाटते. शहरात राहणाऱ्या अनेक लोकांना गावाची ओढ वाटते. विशेषतः गाव सोडून शहरात कामासाठी आलेल्या लोकांना तसेच पर देशात गेलेल्या लोकांना गावाची विशेष ओढ असते.

 

घरातील वडीलधाऱ्या लोकांच्या बोलणयातून गावाबद्दलचे प्रेम नेहमी दिसून येतं. अश्याच प्रकारची गोष्ट आपल्या या चित्रपटात पाहता येणार आहे. रस्त्याने प्रवास करताना सावधान पुढे गाव आहे हा संदेश तुम्ही नक्की पहिला चित्रपटाच्या अश्या नावावरून सामाजिक बाण निर्माण करणार हा चित्रपट असेल असा अंदाज बांधला जात आहे. या चित्रपटातील कलाकारांविषयी माहिती अध्यप गुलदस्त्या आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मुन्नावर शमीम भागात यांनी केले असून मीना शमीम फिल्म्स या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. एका वेगळा विषयावर आधारित हा चित्रपट रहस्य आणि उत्कंठा याचे मिश्रण असेल असे वाटते.