Savita Damodar Paranjpe John Abraham’s first Marathi production

अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीज ने मराठी चित्रपटसुर्ष्टी मधे आपली वाटचाल सुरु केली आहे. प्रियांका चोप्रा, विक्रम फडणीस या नंतर आता जॉन अब्राहमने मराठी चित्रपट निर्मिती क्षेत्रात उडी घेतली आहे.

John in Marathi movies 02
‘विकी डोनर’ या चित्रपटाने अभिनेता जॉन अब्राहमने चित्रपट निर्मिती क्षेत्रात यशस्वीरित्या पदार्पण केले. ‘विकी डोनर’ हा चित्रपट २०१२ ला प्रदर्शित झाला होता या नंतर त्याने मद्रास कॅफे’ (२०१३), ‘रॉकी हॅण्डसम’ (२०१६) आणि ‘फोर्स २’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली. जेए एण्टरटेन्मेन्ट्स च्या माध्यमाने त्याने कायम दमदार कथानकांच्या चित्रपटांना प्राधान्य दिले आहे. त्याने निर्मित केलेल्या या चित्रपटामधून प्रेक्षकांना कायम वेगळे कथानक पाह्यला मिळाले आहे.

 
बॉलिवूडमधील त्याच्या या यशा नंतर तो आता मराठी चित्रपटसृष्टीत निर्मिती करणार आहे. ‘सविता दामोदर परांजपे’ असे या चित्रपटाचे नाव आहे. ‘सविता दामोदर परांजपे’ या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पार पडला व चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. जॉनने या संबंधी माहिती त्याच्या सोशल नेटवर्किंग अकाउंट वरून दिली.

John Marathi movie 02

 

‘सविता दामोदर परांजपे’ या चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो त्याने त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे . या फोटो सोबत त्याने असे लिहिले आहे कि ,
‘सविता दामोदर परांजपे’ या ‘जेए एण्टरटेन्मेन्ट्स’ फिल्मच्या मराठी चित्रपटाच्या सेटवरील पहिला दिवस… त्याने असे हि म्हटले आहे कि तो या चित्रपटाच्या कथेच्या प्रेमात पडला होता आणि अखेर त्याला हा चित्रपट निर्मिती करण्याची संधी मिळाली.

 
‘सविता दामोदर परांजपे’ हा चित्रपट थ्रिलरपट असून हि एका महिलेचे सूड कथा आहे. एक महिला तिला धोका देणाऱ्या पुरुषाचा कशाप्रकारे सूड घेते यावर हा चित्रपट आधारित आहे. ‘फुगे’ या चित्रपटाच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शिका असलेल्या स्वप्ना वाघमारे ‘सविता दामोदर परांजपे’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता सुबोध भावे आणि राकेश बापट मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

 

 

‘सविता दामोदर परांजपे’ हा जॉन अब्राहम निर्मित चित्रपट प्रेक्षकांना किती आवडतो हे पाहणे नक्कीच उत्सुकतेचे ठरणार आहे.

John in Marathi movies 03

Leave a Reply

Your email address will not be published.