‘Satyashodhak’ upcoming Marathi movie.

आपल्या कसदार अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण करणारे अभिनेता संदीप कुलकर्णी लवकरच ‘सत्यशोधक’ या चित्रपटात झळकणार आहेत . या चित्रपटात त्यांच्यासोबत राजश्री देशपांडे मध्यवर्ती भूमिका साकारत आहेत . महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत आपण या दोघांना पाहणार आहोत. फुले दांपत्याच्या आयुष्यावर आधारित असलेला ‘सत्यशोधक’ हा चित्रपट या वर्षअखेरीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

Satyashodhak 02

 

अभिनेत्री राजश्री देशपांडे यांनी ‘सेक्रेड गेम्स’ या वेब सिरीज मधे प्रमुख भूमिका साकारली होती . तसेच संदीप कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेली ‘सिटी ऑफ ड्रिम्स’ या वेब सीरिज गाजल्या आहेत. या दोन्ही कलाकारांचं खूप कौतुक झाल्यानंतर आता पहिल्यांदाच हे दोन्ही कसलेले कलाकार काम करणार आहेत. समता प्रॉडक्शन आणि कथाकार एंटरटेन्मेंटनं यांनी ‘सत्यशोधक’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन नीलेश जळमकर यांनी केले आहे.

 

Satyashodhak 01

 

अभिनेता संदीप कुलकर्णी ‘सत्यशोधक’ या चित्रपटाविषयी बोलताना म्हणाले, “महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दांपत्याचे विचार काळापुढचे होते. तसंच त्यांचं नातंही काळाच्या पुढेच होतं. त्यांच्यातल्या नात्याचा वेध घेण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात येणार आहे. त्यामुळे या दांपत्याचे पुरोगामी विचार, त्यांचं कार्य, त्यांचं नातं यावर हा चित्रपट आधारित हा चित्रपट आहे. चित्रपटाचं ५० टक्के चित्रीकरण पूर्ण झालं आहे. या वर्षाअखेरीला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.”