Sachin Khedekar will play an important role in upcoming movie Baapjanma

sachin khedekar in baapjanm 01

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या नाव नवीन व विषयांवर आधारित चित्रपटाची निर्मिती होताना दिसत आहे. असाच एक नवीन आशयाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांसमोर येत आहे. नवोदित आणि अतिशय हुशार दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी ‘बापजन्म’ हा वेगळा चित्रपट घेऊन येत आहे.‘मराठी कास्टिंग काऊच’ या वेबसिरीजच्या माध्यमातून निपुण धर्माधिकारी हे नाव सर्वत्र प्रसिद्ध झाले. त्याने सादर केलेल्या अत्यंत नाविन्यपूर्ण आणि वेगळ्या संकल्पनेमुळे त्याने फार कमी वेळे मध्ये भरपूर प्रसिद्धी मिळवली. विशेषतः युवकांमध्ये तो फारच लोकप्रिय झाला आहे.

 

‘बापजन्म’ या चित्रपटाचे दिग्दर्शन निपुण धर्माधिकारी करत आहे. या चित्रपटाची घोषणा काही दिवसांपूर्वी सोशल नेटवर्किंग साईटवर करण्यात आली. चित्रपटाच्या आगळ्यावेगळ्या नावामुळे सगळीकडे या चित्रपटविषयी चर्चा सुरु झाली. या चित्रपटात सचिन खेडेकर यांची मुख्य भूमिका असणार आहे. निपुण धर्माधिकारी हा चित्रपट घेऊन येत असल्यामुळे या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये विशेष उत्सुकता आहे. या चित्रपटाचे पोस्टर निपूणने त्याच्या फेसबुक पेजवर पोस्ट करून आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचवले. त्याचबरोबर “बऱ्याच दिवसांनी आपल्यात संवाद होणार आहे आणि मी मनापासून बोलणार आहे. इतकंच म्हणेन की तुम्हीपण मनापासून ऐका!” असे कॅप्शनही लिहिले आहे.

 

निपुण च्या पोस्टवर मिळालेल्या प्रतिक्रिया पाहून या चित्रपटाला रसिक डोक्यावर घेतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.बापजन्म’ ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘शिक्षणाच्या आयचा घो’, ‘हापूस’, ‘आयडीयाची कल्पना’, ‘तुकाराम’, ‘आजचा दिवस माझा’, ‘हॅप्पी जर्नी’, ‘कॉफी आणि बरेच काही’, ‘टाईम प्लीज’, ‘मुंबई-पुणे-मुंबई २’ यांसारखे अनेक गाजलेले सिनेमा देणाऱ्या ‘एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट’ची प्रस्तुती आहे. ‘बापजन्म’ हा चित्रपट १५ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.