Rohit Shetty planning to make a Marathi film soon

​हिंदी चित्रपट सृष्टीलातील एक नामवंत दिग्दर्शक म्हणजे रोहित शेट्टीच्या .सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार रोहित शेट्टी च्या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच होणार सुरू होणार आहे.

Rohit shetty 01
​रोहित शेट्टीने दिलेल्या एका मुलाखती मध्ये त्याने सांगतले कि त्याच्या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण या वर्षाच्या अखेरीपर्यंत सुरू होणार आहे.
सध्या या चित्रपटाच्या पटकथेवर काम सुरु आहे . रोहित शेट्टी ची गाजलेले चित्रपट म्हणजे गोलमाल, संडे, गोलमाल रिटर्न्स, सिंघम, गोलमाल 3, चेन्नई एक्सप्रेस, सिंघम रिटर्न्स, दिलवाले. हिंदी चित्रपटसुर्ष्टीला अनेक हिट चित्रपट दिल्या नंतर तो आता मराठी चित्रपटांकडे वळला आहे असे दिसते.

 

अलीकडच्या काळात मराठी चित्रपटांना मिळालेल्या यश्या नंतर बॉलीवूड मधील अनेकांनी मराठी चित्रपट सृष्टीकडे धाव घेतली आहे हे तर तुमहाला माहीतच आहे. प्रियांका चोप्रा , विक्रम फडणीस ,अजय देवगण, अक्षय कुमार यांसारखे अनेक बॉलिवूडचे सेलिब्रिटी सध्या मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहेत.

 

Rohit shetty 02

रोहित शेट्टी मराठी चित्रपट निर्मिती करणार अशी चर्चा अनेक दिवसं पासून सुरु होती. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार शाहरुख खान आणि राहित शेट्टी मिळून मराठी चित्रपट बनवणार असल्याचे म्हटले जात होते.दिलवाले, चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटामध्ये त्यांनी एकत्र काम केले होते. सध्या तो गोलमाल याचित्रपटामध्ये व्यस्त होता तसेच सध्या खतरों के खिलाडी या कार्यक्रमचे सूत्रसंचान करत असल्यामुळे तो बीझी आह. या कार्यक्रमाच्या चित्रीकरणासाठी तो लवकरच स्पेनला रवाना होणार आहे व तीथून परतल्यावर या वर्षाच्या अखेरीस तो त्याच्या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. लवकरात लवकर या चित्रपटाच्या पटकथेवरील काम पूर्ण होईल असे त्याने सांगितले. या वर्षाच्या अखेरीपर्यंत तो या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करेल आहे आशा त्याने व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.