Remo Dsouza at Gavthi movie music launch

फेब्रुआरी महिना सुरु झाला असून व्हॅलेन्टाईन डे निमित्त सगळीकडे तरुणाईला आकर्षित करण्यासाठी अनेक गोष्टी येतात. व्हॅलेन्टाईन दिवशी काही तरी खास करावा असा विचार प्रत्येक जण करत असतो. यंदाच्या व्हॅलेन्टाईन निमित्त सुप्रसिद्ध नृत्य आणि सिने दिग्दर्शक रेमो डिसोझा ने त्याच्या फॅन्स साठी एक रोमँटीक गाण्याचे अनावरण केले आहे. गावठी या आगामी चित्रपाटातील हे गाणं असून ‘दिसू लागलीस तू’ असे या गाण्याचे बोल आहेत. हे गाणे अश्विन भंडारे यांनी स्वरबद्ध केले आहे. व्हॅलेन्टाईन डे स्पेशल गिफ्ट म्हणून एका दिमाखदार सोहळ्यात रेमो डिसोझा यांनी हे गाणे तरूणाईला समर्पित केले.आनंदकुमार (ॲन्डी) यांनी या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन केले आहे.आनंदकुमार (ॲन्डी) गेली पंधरा वर्षांपासून रेमो डिसोझा यांचा साहाय्यक म्हणून काम बघत आहे. या वेळी रेमो आपल्या पत्नी लीझलसोबत उपस्थित होता. आनंदकुमारने या प्रेम गीतासाठी एक स्पेशल सिग्नेचर डान्स स्टेप चित्रीत केली आहे.

 

Remo Dance at Gavthi movie music launch 01

मुंबई येथील एका पंचतारांकित हॉटेल मध्ये हा संगीत प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी या चित्रपटातील प्रमुख कलाकार श्रीकांत आणि योगिता यांनी या गीतावर बहारदार नृत्य सादर केले. रेमो डिसोझा आणि दिग्दर्शक आनंदकुमार (ॲन्डी) यांनी स्टेजवर अचानक एंट्री घेतली आणि त्या स्पेशल डान्स स्टेपवर डान्स केला.

 

Remo Dance at Gavthi movie music launch 02

 

प्रसिद्ध उद्योजक किशोर गुलगुले आणि रेमो यांच्या हस्ते गावठी या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. या वेळी आर. बी. प्रोडक्शनचे निर्माते आणि कथा लेखक सिवाकुमार श्रीनिवासन, चित्रपटातील कलाकार नागेश भोसले, वंदना वाकनीस, संदिप गायकवाड, गौरव मोरे, सदानंद यादव, सिनेमॅटोग्राफर अजीत रेड्डी, संगीतकार अश्विन भंडारे – श्रेयस आंगणे, पिकल एंटरटेनमेन्टचे समीर दीक्षित-ऋषिकेश भिरंगी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. गावठी हा तिरस्काराने उच्चारलेला शब्द अपमान नाही तर अभिमान वाटावा, असा आर. बी. प्रोडक्शन निर्मित चित्रपट लवकर प्रदर्शित होणार आहे.

‘दिसू लागलीस तू’ हे व्हॅलेन्टाईन स्पेशल प्रेम गीत आणि स्पेशल डान्स स्टेप नक्की पहा :