Ravi Jadhav’s ‘Nude’ the movie will be released on this date

Ravi Jadhav's movie ready for release 03

 

अनेक दिवसांपासून रवी जाधव यांचा न्यूड हा चित्रपट सेन्सर बोर्डामुळे प्रसिद्ध होऊ शकला न्हवता. या चित्रपटाच्या नावामुळे सगळीकडे या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु होती. गोवा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन या चित्रपटाने कार्नाय्त येणार होते मात्र आईनं वेळी हा चित्रपट वगळण्यात आला. या अपमानास्पद घटनेमुळे दिग्दर्शक रवी जाधव यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांची नाराजी देखील व्यक्त केली होती. या नंतर दुर्गा या महोत्सवातून देखील हा चित्रपट वगळण्यात आला व यानंतर चित्रपटाला न्याय मिळावा यासाठी रवी जाधव कोर्टात गेले होते. अनेक मराठी कलाकारांनी रवी जाधव यांना पाठिंबा दिला होता. आता अखेरीस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस लवकरच येणार आहे.

 

Ravi Jadhav's movie ready for release 02

 

अभिनेत्री विद्या बालनसह ज्युरीने या चित्रपटाला स्टँडीग ओवेशन देत कौतुक केले होते. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून ए सर्टिफिकेट मिळाले व त्यानंतर हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार अशी उत्सुकता सगळ्यांना लागली होती. सर्व प्रेक्षकांना हे काळातच आनंद होईल कि हा चित्रपट लवकच प्रदर्शित होत आहे. येत्या २७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे कोणत्याही कट्सविना हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

 

न्युड या चित्रपटात राजश्री देशपांडे प्रमुख भूमिका साकारत असून या चित्रपटाची कथा खूपच वेगळी आहे. या चित्रपटाच्या कथानकावरून देखील चांगलाच वाद झाला होता. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार या चित्रपटाची कथा लेखिका मनिषा कुलश्रेष्ठ त्यांच्या पुस्तकातून चोरली असल्याचा आरोप त्यांनी लावला होता. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, “मी रवी जाधव यांना कथेबाबत विचारले असता त्यांनी मला उडवाउडवीची उत्तरे दिली होती. पण या चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर हा चित्रपट मी लिहिलेल्या कथेवरच बेतलेला असल्याचे माझ्या लक्षात आले. त्यामुळे मला या कथेचे मानधन न मिळाल्यास मी कोर्टाचे दरवाजे ठोठावेन.” न्युड या चित्रपटाबाबत निर्माण झालेल्या वादांमुळे हा चित्रपट प्रदर्शनाआधीच चर्चेत आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतील हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.