Ravi Jadhav presents upcoming movie ‘Yuntum’

Yuntum 02

 

मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले निर्माता दिग्दर्शक अर्थात रवी जाधव. रवी जाधव यांनी मराठी चित्रपटसृष्टीला अनेक हिट चित्रपट दिले त्याचप्रमाणे अनेक चांगल्या चित्रपटांसाठी त्यांनी प्रस्तुतकर्त्यांची भूमिका घेतली. लवकरच यंटम हा समीर आशा पाटील दिग्दर्शित चित्रपट तुम्हचय अभेटीसाठी येत आहे. या चित्रपटाची प्रस्तुती रवी जाधव फिल्म्सची असून अतुल ज्ञानेश्वर काळे हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.

 

अभिजित पानसे दिग्दर्शित रेगे आणि प्रकाश कुंटे दिग्दर्शित कॉफी आणि बरंच काही या दोन चित्रपटाची प्रस्तुती रवी जाधव फिल्म्सने केली होती. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळाली होती. यंटम या वेगळ्या नावामुळे सगळीकडे या चित्रपटाची उत्सुकता दिसत आहेत. यंटम या चित्रपटात टीनएज लव्हस्टोरी वर आधारित चित्रपटाची कथा- पटकथा-संवाद समीरसह मेहुल अघजा यांनी लिहिले आहेत.यंटम हि लव्हस्टोरी असूही आयुष्याबद्दल काहीतरी वेगळा दृष्टिकोन देणारा चित्रपट आहे . या चित्रपटाचे संगीत चिनार-महेश या जोडीने दिले आहे. चित्रपटातील गाणी मंगेश कांगणे यांनी लिहली आहेत.

 

Yuntum 01

 

यंटम बद्दल बोलताना रवी जाधव सांगतात, ” यंटम म्हणजेच वेडेपणा. आजच्या ग्रामीण महाराष्ट्रातील तरुणांची अत्यंत तरल प्रेमकथा, ज्यात दाहक वास्तवतेचा पदर आहे आणि प्रेमात काहीही करण्याचा वेडेपणा आहे अशा लोकांची कथा प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.”रवी जाधव यांनी या आधी अभिजित पानसे आणि प्रकाश कुंटे या नव्या दमाच्या टॅलेटेड दिग्दर्शकांचे चित्रपट प्रस्तुत केले होते. या नंतर आता समीर आशा पाटील या तरुण टॅलेंटेड दिग्दर्शकाचा चित्रपट प्रस्तुत करताना त्यांना आनंद होती आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून सयाजी शिंदेसारख्या मात्तबर कलाकारासोबत काम करण्याची संधी मिळाल्या मुळे त्यांना अत्यंत आनंद होत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात बरेच नवोदीत कलाकार पहिल्यांदा पडद्यावर काम करणार आहेत.

यंटम ही टीनएजमधली रिफ्रेशिंग आणि म्युझिकल लव्हस्टोरी असून २ फेब्रुवारीला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.