‘Purushottam’ upcoming movie directed by Rima Amarapurkar.

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक अजरामर भूमिका साकारणारे कलाकार अर्थात दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर. त्यांनी मराठी रंगभूमीवर देखील त्यांच्या अभिनयाचा स्वतंत्र ठसा उमटविला होता. त्यांनी साकारलेल्या अनेक भूमिका पाहून नवोदित कलाकार आजही शिकत आहेत. विशेष म्हणजे त्यांचा हा अभिनयाचा वारसा त्यांच्या कन्या पुढे चालविणार आहे. सदाशिव अमरापूरकर यांची थोरली कन्या आगामी चित्रपटात प्रमुख भूमिका करत असून त्यांची धाकटी कन्या या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. ‘पुरूषोत्तम’ असे या आगामी चित्रपटाचे नाव आहे.

 

Purushottam 01

हा चित्रपट दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या पत्नी सुनंदा अमरापूरकर यांची प्रस्तुती असून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सदाशिव अमरापूरकर यांची धाकटी कन्या रिमा अमरापूरकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केले आहे. तसेच ज्येष्ठ कन्या केतकी अमरापूरकर या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार असून त्याची या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका आहे. प्रथमच या चित्रपटाच्या निमित्ताने अमरापूरकर मायलेकी एकत्र काम करणार आहेत.

 

Purushottam 02

 

नुकतंच या चित्रपटाचे पोस्टर सोशल नेटवर्किंग साइटवर प्रदर्शित करण्यात आलं आहे.संवेदना फिल्म फाऊंडेशन आणि आदर्श ग्रुप यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून समाजहिताच्या ध्येयाने झपाटलेल्या एका प्रामाणिक अधिका-याची गोष्ट या चित्रपटातून आपण पाहणार आहोत. दरम्यान, केतकी अमरापूरकरसह नंदु माधव हे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. त्याचप्रमाणे भूमिका असून, किशोर कदम, देविका दफ्तरदारआणि पूजा पवार हे कलाकारदेखील झळकणार आहेत. सदाशिव अमरापूरकर यांच्या जन्मदिवसाच्या एक दिवस आधी म्हणजेच, येत्या १० मे रोजी अमरापुरकर मायलेकींचा ‘पुरूषोत्तम’ हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.