Priyanka Chopra’s Ventilator wins ‘Pune International Film Festival’ award..

PC Ventilator 01
‘व्हेंटिलेटर ‘ म्हणजे निखळ मनोरंजनाची आणि नात्यांचं महत्व सांगणारा . बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा हीचा पहिली मराठी निर्मिती असलेला व्हेंटिलेटर हा चित्रपट चांगलाच गाजला आहे. या चित्रपटाची लोकांमध्ये विशेष उत्सुकता होती कारण म्हणजे या सिनेमाची निर्मिती प्रियंकाने केली होती तसेच या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक राजेश मापुस्कर यांनी केलं आहे. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे आशुतोष गोवारीवर यांनी यात मुख्य भूमिका साकारली होती. पर्पल पेबल पिक्चर्स ह्या प्रियांका चोप्राच्या निर्मिती संस्थेचा हा पहिलाच मराठी चित्रपट होता. मराठी सिने आणि नाट्यसृष्टीतल्या अनेक मान्यवरांनी ‘व्हेंटिलेटर’ या चित्रपटात काम केले होते. आशुतोष गोवारीकर आणि बमन इराणी यांनी साकारलेल्या मुख्य भुमिका प्रेक्षकांच्या मनात अजूनही आहेत. व्हेंटिलेटर सिनेमाची कथा कौटुंबिक मूल्ये, प्रथा, परंपरा आणि नातेसंबंध ह्यावर आधारित अशी होता. या वर्ष्याच्या सुरवातीला म्हणजे २९ जानेवारीला सायंकाळी ७ वा. झी मराठीवरुन ‘व्हेंटिलेटर’चा वर्ल्ड प्रीमियर प्रसारित करण्यात आला होता.

‘व्हेंटिलेटर’ हा चित्रपट गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित झाला होता. ‘व्हेंटिलेटर’ या चित्रपटाला यंदाच्या पंधराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात(PIFF) सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार मिळाला आहे.राजेश मापुस्कर ह्यांनीच ह्या सिनेमाच्या पटकथेवरही काम केलं होतं तसेच त्यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केले होते.

या चित्रपटाला पुरस्कार मिळाल्या नंतर चित्रपटाच्या निर्मात्या मधू चोप्रा म्हणतात, “व्हेंटिलेटर सिनेमाशी निगडीत प्रत्येकाचा हा सन्मान आहे. ह्या सिनेमाचा विषय माझ्या हृदयाला भिडला. सिनेमाचा विषय प्रियंका, राजेश आणि आम्हां सगंळ्यानाच खुप भावला होता. ह्या चित्रपटाची निवड न्युयॉर्क चित्रपट महोत्सवासाठीही झालीय.”राजेश मापुस्कर ह्या पुरस्काराविषयी प्रतिक्रिय़ा देताना म्हणाले, “ पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मिळालेल्या सर्वोत्कृष्ठ पटकथेचा हा पुरस्कार माझा पहिला पुरस्कार आहे. मला अतिशय अभिमान वाटतो, की आमच्या पटकथेला हा पुरस्कार मिळाला. माझ्या लेखनाचं कौतुक झाल्याचा हा अभिमान आहे. व्हेंटिलेटर चित्रपटाची टिम आणि पर्पल पेबल पिक्चर्सचा हा सन्मान आहे.”

सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार प्रियंका चोप्रा आणखी एक मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यास सज्ज झाली आहे. या चित्रपटाचे नाव आहे ‘काय रे रास्कला’. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा मुहुर्त पार पडला, यावेळी मधु चोप्रा, दिग्दर्शक गिरीधरन स्वामी, गौरव घाटणेकर, कुनिका सदानंद आदि कलाकार उपस्थित होते. काही कारणामुळे प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री प्रियंका चोप्रा यांना स्वतः उपस्थित राहता आले नव्हती , मात्र तिने व्हिडीयोद्वारे काय रे रास्कला च्या संपूर्ण टीम ला शुभेच्छा दिल्या. तिचा हा आगामी चित्रपट प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात यशस्वी होईल अशीदेखील आशा तिने यावेळी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published.