Priyanka Chopra announces her upcoming Marathi Project : “Firebrand”

प्रियांका चोप्रा हे नाव भारतातच नाही तर आज संपूर्ण जगभरात गाजत आहे. प्रियंकाने बॉलिवूड तसेच हॉलिवूडमध्ये तिची वेगळी ओळख निर्माण केली. या सगळ्यामध्ये तिचे मराठीबद्दलचे प्रेम हे नेहेमीच दिसून आले. ‘व्हेंटिलेटर’ आणि ‘काय रे रास्कल’ या चित्रपटानंतर ती घेऊन आली आहे ‘फायरब्रॅण्ड’. प्रियंकाच्या होम प्रॉडक्शन पर्पल पेबल पिक्चर्सकडून लावकारच या चित्रपटाची शूटिंग सुरु करण्यात येणार आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाचे एक पोस्टरही समोर आले आहे.‘फायरब्रॅण्ड’ या चित्रपटासोबत २०१८ चे स्वागत’ असे ट्विट पर्पल पेबल पिक्चर्सकडून करण्यात आले.

 

Firebrand 01

या शिवाय प्रियांका चोप्रा ने एक ट्विट केले आहे ज्यामध्ये लिहिले की, २०१८ या वर्षाला सुरुवात झाली असून, आम्ही उत्कृष्ट दिग्दर्शिका अरुणा राजे पाटील यांच्यासोबत आमच्या नव्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. प्रियांका ने ‘व्हेंटिलेटर’ या चित्रपटाने चित्रपट निर्मितीला सुरवात केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजेश मपुस्कर यांनी केले होते. ६४ व्या राष्ट्रीय पुरस्कार समारंभात ‘व्हेंटिलेटर’ या चित्रपटाला तीन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. या चित्रपटाला प्रेक्षकांनि भरपूर पसंती व्यक्त केली. त्यामुळेच आता आता प्रियंकाचा ‘फायरब्रॅण्ड’ या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये भरपूर उत्सुकता दिसत आहे.

 

Firebrand 02

 

प्रियंका चोप्रा सध्या तिच्या हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये बिझी असून ती काही दिवसांपूर्वी भारतात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या तिचे बॉलीवूड मध्ये कोणतेही प्रोजेक्ट सुरु नाही. प्रियंकाने बॉलिवूड प्रोजेक्ट अगोदरच मराठी प्रोजेक्टला सुरुवात केल्याने, तिच्या चाहत्यांना काहीसा दिलासा नक्कीच मिळेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन अरुण राजे करणार असून या चित्रपटात गिरीश कुलकर्णी ,सचिन खेडेकर ,उषा जाधव, राजेश्वरी सचदेव हे कलाकार झळकणार आहेत.