“Preeti Sumane” from Maaza Ahadbam sung by Shreya Ghoshal & T Satiish Chakravarthy.

‘अगडबम’ या आठ वर्षांपूर्वी आलेल्या चित्रपटाने प्रेक्षकांना अगदी लोटपोट हसवलं होतं . चित्रपटातील मुख्य पात्र अर्थात नाजूक हिने तर प्रेक्षकांचे मन जिंकलं होतं . याच कारणामुळे ती पुन्हा एकदा ‘माझा अगडबम’द्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Majha Agadbam 03‘अगडबम’ या मराठी चित्रपटाने प्रेक्षकांना खळखळून हसवलं आणि आज हि या चित्रपटच नाव घेताच तुमच्या डोळ्यासोमर येईल ती म्हणजे नाजूका अर्थात अभिनेत्री तृप्ती भोईर . लवकरच अभिनेत्री अर्थात नाजुका पुन्हा एकदा ‘माझा अगडबम’द्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अभिनेता सुबोध भावे आणि तृप्ती भोईर या चित्रपटातील प्रमुख कलाकार आहेत. या चित्रपटातील विनोदाचा उच्चांक गाठणारे ‘अटकमटक’ ‘गाणे सध्या प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन करत असतानाच, आणखीन एक गाणे रसिकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याचे नाव ‘प्रीती सुमने’ असे असून हे प्रेमगीत सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. सुबोध भावे आणि तृप्ती भोईर यांच्यावर चित्रीत केलेले ‘प्रीती सुमने’ हे गाणे नाजूका आणि तिचा पती रायबाच्या आगळ्यावेगळ्या प्रेमावर आधारित आहे.

 

‘पेन इंडिया लिमिटेड कंपनी’ चे जयंतीलाल गडा आणि तृप्ती भोईर फिल्म्स प्रस्तुत ‘माझा अगडबम’ हा सिनेमा ‘नाजूका’ या प्रमुख पात्रावर आधारित आहे. सर्वसामान्य प्रेमी युगूलांपेक्षा अगदी हटके असणाऱ्या या जोडीची प्रेमछटा दाखवणारे ‘प्रीती सुमने’ हे गाणे मंगेश कांगणे यांनी शब्दबद्ध केले आहे. तसेच, टी. सतीश चक्रवर्ती यांनी या गाण्याला संगीत दिले असून, हिंदीची सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषालसह त्यांनी हे गाणे गायलेदेखील आहे.