Nawazuddin Siddiqui wishes luck for upcoming Marathi Movie ‘Dry Day’

बॉलीवूड स्टार नावाझुद्दीन सिद्धिकीने ‘ड्राय डे’ या चित्रपटासाठी अभिनेता ऋत्विक केंद्रेला भरपूर शुभेच्छा दिल्या.तसेच या सिनेमाच्या ट्रेलरची लिंकदेखील त्याने त्यांच्या ट्वीटरवर पोस्ट केली आहे. ‘ड्राय डे’ या चित्रपटा बाबत सिनेरसिकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.सुपरहिट गाण्यांचा तडका आणि तरुण कलाकारांचा ताफा असलेल्या या सिनेमात ऋत्विक केंद्रे, चिन्मय कांबळी, कैलास वाघमारे, पार्थ घाटगे, मोनालिसा बागल, आयली घिए, सानिका मुतालिक हे नवोदित कलाकार महत्वपूर्ण भूमिका साकारत आहेत.

 

आगामी चित्रपट ‘ड्राय डे’ विषयी सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. ‘अशी कशी’ हे या चित्रपटातील रोमँटिक गाणे सध्या यूट्यूब वर गाजते आहे .प्रेमाच्या दुनियेची रंगीत सफर या गाण्यातून घडून येत आहे. ऋत्विक केंद्रे आणि मोनालिसा बागल या फ्रेश जोडीवर हे गाणे चित्रीत करण्यात आले आहे. नव्याने प्रेमात पडलेल्या जोडप्यानं हे गाणे आपलेसे वाटत आहे. जय अत्रे लिखित या गाण्याला हिंदीचे सुप्रसिद्ध गायक जोनीता गांधी आणि अॅश किंग यांचा गोड आवाज लाभला आहे. जोनीता आणि अॅश हे बॉलीवूड मधील नावाजलेले गायक आहेत. आणि त्यांचे हे पहिले मराठी गाणे आहे. या गाण्याचे चित्रीकरण काश्मीरच्या नयनरम्य ठिकाणी झाले असून श्रीनगरच्या आल्हाददायी निसर्गाचा अनुभव या गाण्यातून रसिकांना घरबसल्या घेता येणार आहे.

 

 

Dry Day Article 02

 

 

आनंदसागर प्रॉडक्शन हाऊस प्रस्तुत आणि संजय पाटील निर्मित, पांडुरंग जाधव दिग्दर्शित ‘ड्राय डे’ या आगामी सिनेमाच्या ट्रेलरने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहे. दिग्दर्शक पांडुरंग जाधव लिखित या आगळ्या वेगळ्या ‘ड्राय डे’ची पटकथा आणि संवाद नितीन दीक्षित यांनी लिहिले आहेत. तरुणाईची मौजमस्ती आणि एका रात्रीची धम्माल गोष्ट सांगणारा हा सिनेमा १३ जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. ‘ड्राय डे’ सिनेमाबद्दल सिनेरसिकांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे हा चित्रपट प्रदर्शित झाल्या नंतर प्रेक्षकांची प्रतिक्रिया पाहणे उत्सुकतेचे ठरेल.