Music launched for upcoming movie Aarti-the unknown love story

Aarti 02

‘आरती – द अननोन लव्हस्टोरी’ या मराठी चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा नुकतंच पार पडला. हा चित्रपट सारा क्रिएशन व मिनीम फाऊंडेशनची प्रस्तुती असून या समारंभाच्यावेळी सगळे मान्यवर उपस्थित होते. सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या हस्ते ध्वनीफितीचे अनावरण करण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले कि चित्रपटातील गीते प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेतील हे नक्की. तसेच या प्रसंगी ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान ,संगीतकार अमित राज, पंकज पडघन तसेच समाजसेविका गौरी सावंत उपस्थित होते.

Aarti 04

 

‘आरती – द अननोन लव्हस्टोरी’ हा चित्रपट मानवी मूल्यंन दाखवणारी एक प्रेमकथा आहे. या चित्रपटातून प्रेमाच्या बंधाचे अनोखे पैलू उलगडणार आहेत. या चित्रपटातील प्रमुख भूमिका रोशन विचारे आणि अंकिता भोईर हे कलाकार करत असून यांच्यासोबत सपना कारंडे, उमेश दामले, सुजित यादव तेजस बने, मेघाली जुवेकर, प्रांजली वर्मा, कांचन पगारे तसेच बालकलाकार सारा मेणे व अनुष्का पाटील हे कलाकार झळकणार आहेत.

 

Aarti 03

 

शेफाली साथी व बानुमती सुजित हे या चित्रपटाचे सहनिर्माते असून या चित्रपटाचे छायांकन व संकलन जोतीरंजन दास याचं आहे. कलादिग्दर्शक महेश मेणे त्यांचे आहे. तसेच संवाद प्रभाकर भोसले यांचे आहेत. या चित्रपटात सुजित यादव व तेजस बने यांनी शब्दबद्ध केलेली सहा गीते असून प्रशांत सातोसे व सुजित – तेजस यांनी हे गाणी संगीत बध्ध केली आहेत. यातील ‘पार्वतीच्या नंदना मोरया गजानना’ आणि ‘पावसाळी मनी माझ्या पेटला काहूर का’ या गीताला गायक आदर्श शिंदे यांचा तर ‘मन बावरे’ गीताला हरिहरन व दिपाली साठे यांचा आवाज लाभला आहे. तसेच ‘नन्ही सी परी’ ही अंगाईगीत व ‘विठ्ठला’ हे भक्तीमय गीत प्रशांत सातोसे व ‘आम्ही जातो’ हे सुजित यादव या गायकांनी गेले आहे.

 

‘आरती – द अननोन लव्हस्टोरी’ हा चित्रपट येत्या १८ ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.