Mitali Mayekar’s upcoming movie ‘Aamhi Befikar’

तुम्हाला तुमच्या कॉलेज चे दिवस आठवतात का ? मित्र-मैत्रिणी, धमालमस्ती, कॉलेजचं बिंधास्त आयुष्य .लवकरच आपल्याला हे सगळंच मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. प्रत्येक माणसाच्या हमखास आठवणींमध्ये असलेला हा काळ त्यांना पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे . ‘आम्ही बेफिकर’ या चित्रपटातुन कॉलेजमधील हीच धम्माल मज्जा मस्ती मांडण्यात आला आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

Amhi Befikar 03

 

 

जर आपल्याला आयुष्यात खूप काही कमवायचे आहे तर आपल्याला खूप काही गमवावे लागते आणि अश्याच गमावलेल्या अनुभवातून पुन्हा स्वप्न रंगवायचा प्रयत्न आपण करत असतो. ‘आम्ही बेफिकर’ हा चित्रपट या आशयावर आधारित आहे. हल्लीची तरुण पिढी व त्यांच्या मनातील विचार मनातले विचार पडद्यावर मांडणारा आणि त्यांच्याच भाषेत बोलणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटाचा टीझर पाहता तुम्हाला हे लक्षत येईल. आजपर्यंत कॉलेज जीवनावर आधारित अनेक चित्रपट येऊन गेले असले, तरी त्यात ‘आम्ही बेफिकर’ नक्कीच वेगळा ठसा उमटवेल, असा विश्वास चित्रपटाच्या टीमने व्यक्त केला आहे.

 

 

Amhi Befikar 02

 

 

‘आम्ही बेफिकर’ या चित्रपटात मिताली मयेकर आणि सुयोग गोऱ्हे हे प्रमुख भूमिका साकारत असून , राहूल पाटील, स्वप्नील काळे आणि अक्षय हाडके या कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.हरिहर फिल्मनिर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन कविश्वर मराठे यांनी केलं आहे. ‘आम्ही बेफिकर’ हा चित्रपट येत्या २९ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.