Miss Earth India Hemal Ingale soon to be seen in this Marathi Movie

Aas 01

 

सध्या सर्वत्र ‘मिस वर्ल्ड’ हा किताब मिळवणाऱ्या मानुषी छिल्लर हिची चर्चा सुरु आहे.‘मिस वर्ल्ड’ चा किताब जिंकल्यानंतर मानुषी छिल्लर बॉलिवूडमध्ये एंट्री करणार का याविषयी विचारल्या गेलेल्या प्रश्नावर याविषयी विचार केला नसल्याचे म्हटले असून आमिर खान फेव्हरेट अभिनेता असल्याचेही ती सांगायला विसरली नाही.सौंदर्यस्पर्धा जिंकल्यानंतर बहुतौन्श तरुणी बॉलिवूड चित्रपटासाठी प्रयत्न करतात.परंतु अशी एक माजी मिस अर्थ इंडिया आहे जी बॉलिवूड सिनेमा नाहीतर मराठी सिनेमातून आपली नवी ओळख बनवण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘मिस अर्थ इंडिया’ चा मुकुट संपादन केलेली हेमल इंगळे मराठी चित्रपट ‘आस’ मधून मराठी चित्रसृष्टीत पदार्पण करीत आहे.

हेमल इंगळे हि मुळची कोल्हापूरची आहे . ती अस्सल मराठमोळ्या वातावरणात वाढली आहे हेमल इंगळे. हेमल ने पर्यावरण संवर्धनावर आधारित असलेल्या सौंदर्यस्पर्धेत ‘मिस अर्थ इंडिया’ हा प्रतिष्ठित किताब मिळवला.दिल्लीत येथे झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातून पाच तर देशभरातून ३५ मुलींनी भाग घेतला होता. त्यानंतर हेमलने सातासमुद्रापार अमेरिकेत होणाऱ्या ‘मिस अर्थ वर्ल्ड’ या जागतिक सौंदर्यस्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. तिने आता अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला असून, आगामी चित्रपट ‘आस’ मधून आपण तिला पाहणार आहोत. तिला या आधी देखील अनेक चित्रपटासाठी विचारण्यात आले होते पण ती मनाला भावेल अश्या कथानकाची वाट पाहत होती. हेमल सहा कोणते कलाकार या चित्रपटात झळकणार याविषयी माहिती सध्या गुलदस्त्यात आहे.

तर, हेमल इंगळे ही सौंदर्यवती आता आपल्या मातृभाषेतील चित्रपटक्षेत्रात पदार्पण करीत आहे. कथा-पटकथा-संवाद लेखक तसेच निर्माते आणि दिग्दर्शक मनोज विशे यांच्या ‘आस’ या चित्रपटात ती मध्यवर्ती भूमिकेत आहे. ‘पहिल्यांदाच चित्रपटात भूमिका करत असूनही तिने नवखेपणाचा लवलेशही दर्शविला नाही. खरोखरच हेमल इंगळे ही ‘ब्युटी विथ ब्रेन्स’ आहे. तिचा अभिनय बघून ती लवकरच आघाडीची अभिनेत्री होणार यात शंकाच नाही’ असं ‘आस’ चित्रपटाचे निर्माते- दिग्दर्शक मनोज विशे यांनी सांगितलं. स्वरनाद क्रिएशन ची प्रस्तुती असलेला मनोज विशे दिग्दर्शित ‘आस’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.