‘Miranda House’ the upcoming Marathi suspense thriller.

Miranda house 01

सध्या सर्वत्र आयपीएल तसेच मतदानाचे वारे वाहात दिसत आहे. अश्यातच प्रेक्षकांची उत्कंठा अधिक वाढवणारा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येत आहे. ‘मिरांडा हाऊस’ असे या रहस्यमय चित्रपटाचे नाव असून राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक राजेंद्र तालक या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.विशेष म्हणजे मराठी आणि कोकणी या दोन भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अभिनेता मिलिंद गुणाजी, साईंकित कामत आणि पल्लवी सुभाष यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

 

Miranda house 02

 

काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. हा ट्रेलर पाहता या चित्रपटात काहीतरी मोठी गुंतागुंत असणार हे नक्की. हा ट्रेलर पाहून अनेक तर्कवितर्कही सध्या काढले जात आहेत. या ट्रेलर वरून हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांना आवडणार यात शंका नाही. पल्लवी सुभाष तिचा पहिला संवाद ‘नाव मोहनचं आणि नंबर मोहिनीचा’ म्हणताना तिच्या डोळ्यातील आणि चेहऱ्यावरील अविर्भाव यातच तिचे अभिनयकौशल्य दिसते. चित्रपटाचा ट्रेलर बघताना जे संवाद कानी पडतात त्यावरून चित्रपट पंचमहाभूतांवर तयार केलेल्या चित्रांवर आधारित असल्याचे दिसून येत आहे.

 

Miranda house 03

 

येत्या १७ एप्रिल रोजी या ‘मिरांडा हाऊस’चे हे रहस्य अखेर उलगडणार आहे. या आधी राजेंद्र तालक यांनी ‘सावली’, ‘सावरिया.कॉम’, ‘अ रेनी डे’ यांसारखे पठडीबाहेरचे चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिले आहेत. त्यामुळे या चित्रपटातून प्रेक्षकांना काही तरी नवीन पाहता येणार आहे हे नक्की.