Marathi make up artists in Bahubali

नुकताच रिलिज झालेल्या बाहुबली २ या चित्रपटाने अनेक नवे विक्रम केले आहेत. या चित्रपटातील मनमोहक सुंदरी म्हणजे देवसेना. बाहुबली या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात सर्व प्रेक्षक ज्या अद्भुत सौंदर्यवती च्या रूपाने घायाळ झाले ती देवसेना बाहुबली चित्रपटाच्या पहिल्या भागात मात्र अतिशय भयंकर दिसत होती.
तिचं ते विदारक रूप साकारणार दोन मराठी हातां म्हणजे प्रताप बोऱ्हाडे आणि डी एन इरकर.

अभिनेत्यांना रंग लावून स्वतः पडद्यामागे राहणारे हे दोन कलाकार आतापर्यंत प्रसिद्धीपासून दूर होते.पण बाहुबलीचं तेजच इतकं, की त्या तेजाने हे अज्ञात कलाकारही उजळून निघाले.

देवसेनेचं उतारवयातलं रुप अतिशय उत्तम रित्या रेखाटणारा हे कलाकार त्यांचा अनुभव सांगतात. दिग्दर्शक राजामौली यांना पहिल्या भागातल्या देवसेनेचा मेकअप आवडला नव्हता. त्यामुळे बोऱ्हाडे आणि इरकरांना एक दिवस बोलावलं. त्यांना फोन करून बोलावण्य आधी ते बाहुबली पहायला बसले होते त्यावेळी हा मेकअप आपल्याला मिळाला तर? अशी त्यांना ईच्छा निर्माण झाली व योगायोगाने हि संधी त्यांना मिळाली. त्या नंतर राजामौली यांनी त्यांच्या अपेक्षा सांगितल्या आणि त्याप्रमाणे त्यांनी केलं.

या आधीही या जोडीने आपल्या हातांची कमाल उडता पंजाबमध्ये दाखवली होती. अतिशय रूपवान आणि मुळातच ग्लॅमरस असणाऱ्या आलियाला कळकट मळकट दाखवण्याचं आव्हानही या दोघांनीच यशस्वीपणे पेललं.

उडता पंजाब असो किंवा बाहुबली, या दोन्ही चित्रपटांमधल्या त्यांचे काम जसे जबरदस्त आहे त्याच प्रमाणे त्यांचा वैयक्तिक आयुष्यातील प्रवास जास्त प्रेरणादायी आहे.

जुन्नरमधल्या तेजवाडी येथे प्रताप बोऱ्हाडे शेती ची कामे करत असत. 1988 साली शेती सोडून पुण्यात टेम्पोचालक झाले. 1992 साली ते ‘जाणता राजा’ नाटकात काम करु लागले आणि हळूहळू नाटकाच्या रंगपटात ते रमून गेले. लातूरचे डी. एन. इरकर हे डिप्लोमा झाले आहेत. 1996 साली भोसरी एमआयडीसीत नोकरीला लागले. 2006 साली त्यांची ओळख प्रताप बोराडेंशी झाली आणि 2009 साली दोघांनीही बॉलिवुडमध्ये पाऊल टाकलं.

या आधी त्यांनी मर्दानी, उडता पंजाब, बाजीराव मस्तानी या हिट चित्रपांसाठी काम केले आहे . तसेच जगप्रसिद्ध इराणी दिग्दर्शक माजिद मजिदीच्या बियॉन्ड द क्लाऊडसाठीही त्यांनी काम केलं आहे.

Marathi Makeup artist 01

Page 1 of 6

Marathi Makeup artist 01

Page 1 of 6

Leave a Reply

Your email address will not be published.