Manasi Naik lunches the music of upcoming movie ‘Prema’

Prema music launch 02

सध्या मराठीत आजच्या तरुणाईला आवडतील आशय कथानकावर आधारित चित्रपट निर्मिती होताना दिसते. आसाच एक प्रेमावर आधारित चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. प्रेमाचे वेगळ रूप दर्शवणारा हा चित्रपट मार्कंडेय फिल्मची प्रस्तुती असून रमेश व्यंकय्या गुर्रम यांची निर्मिती आहे. नुकतंच य या चित्रपटचा म्युझिक लाँच सोहळा मुंबईत पार पडला. या वेळी चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. या चित्रपटाची ध्वनीफित अभिनेत्री मानसी नाईक हिच्या हस्ते प्रकाशीत करण्यात आली. या प्रसंगी चित्रपटाच्या ट्रेलर व गीताची झलक दाखवण्यात आली. या चित्रपटाचे कथालेखन तसेच दिग्दर्शन सदानंद ज्ञानेश्वर इप्पाकायल यांनी केले आहे. तरुणाईला आवडतील अशी वेगवेगळ्या जॉनरची चार गाणी या चित्रपटात आहेत.

 

Prema music launch 01

गाणी शेखर आनंदे यांनी चित्रपटातील गाणी लिहिली असून संगीतदिग्दशन केले आहे.मानसी नाईक वर चित्रित झालेलं ‘मी गुलाबी नोट दोन हजाराची’ हे ठसकेबाजआयटम साँग रेश्मा सोनावणे यांनी गायलं आहे. तसेच ‘दुनियेच्या आईचा घो’ हे गाणं अवधूत गुप्ते यांनी तर ‘प्रेम सिंधू’ तसेच ‘तुझी आठवण का येते’ या दोन हृदयस्पर्शी गाणी स्वप्नील बांदोडकर यांनी गायली आहेत. तसेच या गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन सिद्धेश पै, आतिष देवरुखकर यांनी केले आहे.

 

प्रेम जिंकण्यासाठी स्वत:मध्ये केलेला बदल व प्रयत्न यांची रंजक कथा प्रेमा या चित्रपटामध्ये आपल्यासमोर मांडण्यात आली आहे. या चित्रपटामधे नारायण निर्वळ, शिल्पा ठाकरे, सचिन बत्तुल, प्रेम नरसाळे, करिश्मा साळवी, संस्कृती शिंदे, प्रकाश धोत्रे, राज नरवडे, शेखर केदारी, संतोष चोरडिया, कस्तुरी सारंग, मनीषा तांबे, महादेव झोळ, सुरेखा कुडची या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रेमा या चित्रपटाचे सहनिर्माते सचिन दत्तात्रेय बत्तुल असून कार्यकारी निर्माते मंगेश रामचंद्र जगताप व मारुती तायनाथ आहेत.