‘Laden Aala Re Aala’ Marathi film releasing on 6th October

Laden aala re aala 01

 

काही दिवसापासून ‘लादेन आला रे आला’ या चित्रपटाची चर्चा रंगताना आपण पाहत आहोत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे पोस्टर सोशल नेटवर्किंग सीईटी वर लाँच करण्यात आले. ‘लादेन आला रे आला’ हा चित्रपट इमार फिल्म्स इंटरनॅशनल युनिट 2 यांची प्रस्तुती असून नझीम रिझवी यांनी या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन केले आहे.

 

या चित्रपटाच्या माध्यमाने अभिनेता अझीम हा मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. तसेच आरती सपकाळ, किशोर नंदलेश्वर, विजय पाटकर, कमलेश सावंत, कांचन पगारे, अतुल तोडणकर, सक्षम कुलकर्णी, अक्षदा पटेल, वृषाली हटलकर, सुनील जोशी, शिवराज वाळवेकर, कार्तिकी सूर्यवंशी, अंकुश मांडेकर, मयूर पवार, अभिलाषा या कलाकारांच्या देखील महत्वपूर्ण भूमिका चित्रपटात आहेत.’लादेन आला रे आला’ या सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन या दोन्ही महत्वपूर्ण भूमिका नझीम रिझवी यांनी सांभाळल्या आहेत.

 

‘लादेन आला रे आला’ या चित्रपटाची कथा नझीम रिझवी आणि सतीश महाडेश्वर यांनी लिहिले आहे . तसेच या चित्रपटाची पटकथा नझीम रिझवी आणि आदेश अर्जुन यांनी मिळून लिहिली आहे. या चित्रपटातील संगीत प्रकाश प्रभाकर आणि आकाश बॉइज यांचं आहे.’लादेन आला रे आला’ हा बहुचर्चित चित्रपट येत्या ६ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

 

पहा या चित्रपटाची एक झलक :