‘Krutant’ Sandeep Kulkarni’s upcoming Movie

‘कृतांत’ असे हटके शीर्षक असलेला चित्रपट लवकरच तुमच्या भेटीसाठी येत आहे. विशेष म्हणजे कृतांत या शीर्षकांतर्गत चित्रपटात काय पाहायला मिळणार याचा कयास लावण्याचं काम सर्व जण करीत आहेत. येत्या १८ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.‘कृतांत’ या चित्रपटाची निर्मिती ‘रेनरोज फिल्म्स’ ने केली असून या चित्रपटाचा टीझर सध्या प्रेक्षकांची उत्कंठा वाढवीत आहे.

 

Krutant 01

 

मनोरंजनासोबतच समाजाला एक सशक्त संदेश देणारा हा चित्रपट दत्ता मोहन भंडारे यांनी दिग्दर्शित केला असून , मिहीर शाह यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे. दिग्दर्शक दत्ता भंडारे यांनीच या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवादलेखन केलं आहे.
अभिनेता संदिप कुलकर्णा या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असून त्याचा वेगळा गेटअप या चित्रपटाचे मुख्य आकर्षण आहे. टीझर मधील संदिपचा गेटअप प्रेक्षकांच्या मनातील संभ्रम आणखी वाढवणारा आहे. हा चित्रपट नेमका कोणत्या प्रकारचा आहे हे शोधण्यासाठी प्रवृत्त करणारा आहे. आजवरच्या कारकिर्दात संदिपने अशा प्रकारची व्यक्तिरेखा कधीही साकारलेली नसल्याने त्याच्या चाहत्यांनाही हा सिनेमा एक वेगळी पर्वणी ठरणार आहे.

 

Krutant 02

 

या चित्रपटात दिग्दर्शक दत्ता भंडारे यांनी एक असा विषय मांडला आहे जो आजवर कधीही समोर आलेला नाही. या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी निसर्ग आणि मानव यातील नातं अधोरेखित करत मानवतेची एक वेगळी व्याख्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटातील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखेसाठी संदिप कुलकणीसारख्याच सशक्त कलाकाराची गरज होती. त्यांनाही ही भूमिका आवडल्याने कथा ऐकताच होकार दिला. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना वर्तमान काळातील गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आजचं जीवन आणि त्या अनुषंगाने बदललेली जीवनशैली याचं चिकित्सक बुद्धीने विश्लेषण करणारा हा सिनेमा सर्व वयोगटातील प्रेक्षकांना काही ना काही देणारा असल्याचं दिग्दर्शकांचं म्हणणं आहे.