‘Khichik’ upcoming Marathi movie.

Kichak 01

 

सध्या मराठी चित्रपटात वेगवेळे प्रयोग करून रसिकांचे लक्ष वेधून घेतले जात आहे. असाच एक वेगळा प्रयोग आपण एका आगामी चित्रपटात पाहणार आहोत. या चित्रपटाचे नाव ‘खिचिक’ असे असून या चित्रपटात काही तरी गुढ, गुपित असणार हे असा अंदाज बांधला जात आहे. “खिचिक” या वेगळ्या नावामुळे या चित्रपटाची सध्या चर्चा आहे.नुकताच सोशल मीडियाद्वारे या चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं. पाठमोरा मुलगा आणि त्याच्या हातात असलेल्या कागदावर वेगवेगळे फोटो असं लक्ष वेधून घेणारं हे पोस्टर आहे. या पोस्टर कडे पाहता नेहमीच्या धाटणीच्या पोस्टरपेक्षा हे पोस्टर वेगळं दिसत असल्यानं ‘खिचिक’ लक्षवेधी ठरत आहे.

या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ जाधव, प्रथमेश परब, सुदेश बेरी, अनिल धकाते , शिल्पा ठाकरे, अभिनेत्री पॉला मॅकगिलीन, शीतल ढाकणे, रसिका चव्हाण ,यश खोंड आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटात कलाकारांच्या गेटअपमध्ये प्रयोग कऱण्यात आले आहेत. सिद्धार्थ आणि प्रथमेश दोघांचा लूक रेट्रो टचमध्ये दिसत आहे. गुरु ठाकूर आणि दत्ता यांनी लिहिलेल्या गीतांना अभिषेक-दत्ता यांचे संगीत लाभले असून योगेश कोळी यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले आहे.

 

चित्रपटाच्या नावातून या चित्रपटाचा विषय स्पष्ट होत नसून हि या हटके टायटलमुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची उत्सुकता कमालीची वाढली आहे. येत्या २० सप्टेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.