Khari Biscuit upcoming Marathi Movie

माणसाच्या आयुष्यात असणाऱ्या प्रत्येक नात्याला एक वेगळाच महतव असतं. मात्र या साऱ्यामध्ये बहीण-भावाचं नातं अत्यंत निराळं आणि तितकंच खास असतं. आणि त्यातच जर भाऊ मोठा असेल तर विचारायलाच नको. आपल्या छोट्या बहीणीची लहानशी इच्छादेखील पूर्ण करण्यासाठी तो अतोनात प्रयत्न करतो. याच विषयावर भाष्य करणारा एक गोड चित्रपट लवकरच येत आहे. ‘खारी बिस्कीट’ असं या चित्रपटाचं नाव असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

 Khari Biscuit 02

 

बहीण-भावाच्या नात्यावर आधारित ‘खारी बिस्कीट’ या चित्रपटाची कथा खारी आणि बिस्कीट या बहीण-भावाच्या जोडीभोवती फिरताना दिसत आहे. खारी नावाची पाच वर्षांची लहान मुलगी असून ती अंध आहे. अश्या आपल्या बहिणीला कधीही अंधत्वाची जाणीव होऊ नये यासाठी बिस्कीट कायम प्रयत्नशील असतो. हे जग त्याची बहीण डोळ्यांनी जरी पाहू शकत असली तरी ती कल्पनेच्या जोरावर बेमालूमपणे स्वप्न पाहत असते. आणि तिचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिचा भाऊ बिस्कीट कायम प्रयत्न करत असतो. खारीने वर्ल्डकप पाहण्याचं स्वप्न पाहिलं आहे आणि आपल्या बहिणीचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिचा भाऊ सर्वतोपरी प्रयत्न करतो. आपल्या चिमुकल्या बहिणीच्या स्वप्नासाठी त्याला काय काय करावं लागतं हे आपण ट्रेलरमध्ये पाहू शकता.

 

Khari Biscuit 01

 

वर्ल्ड कप पाहण्यासाठी खूप पैशाची गरज असते . आणि बहिणीचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बिकट जीवाचा रान करतो तो शक्य ती काम करतो. तोच अगदी चोरी करण्यापासून ते रस्त्यावर विविध सोंग साकारुन लोकांचं मनोरंजन करण्यापर्यंत सर्व काही करून पैसे गोळा करत असतो. शेवटी या दोन चिमुकल्यांच हे स्वप्न पूर्ण होतं कि नाही हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यावर नक्की कळेल.

 

 

या चित्रपटात बिस्कीटची भूमिका आदर्श कदमने केली आहे तर खारी वेदश्री खाडिलकर हिने साकारली आहे. सोहम जाधव, स्वानंद शेळके, शर्व दाते या बालकलाकारां सोबत नंदिता पाटकर, सुयश झुंझुरके आणि संजय नार्वेकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. येत्या १ नोव्हेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे.