‘Kay Re Rascala’ first look realesed

Kay Re Rascala Poster 02

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोपडा यांचा बहुचर्चित चित्रपट ‘काय रे रास्कला’ चा पाहिलं वाहिलं पोस्टर रिलिज करण्यात आले. या आधी ​‘व्हेंटिलेटर’ या यशस्वी मराठी चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली होती. ‘व्हेंटिलेटर’ या चित्रपटाला बरेचसे नामांकित पुरस्कार मिळाले होते.

 

‘व्हेंटिलेटर’ या चित्रपटाला प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळाली होती. तर अनेक दिवसापासून ‘काय रे रास्कला’ या चित्रपटाची चर्चा सर्वत्र सुरु होती. बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोपडा सध्या यांच्या हॉलिवूड मधील बेवॉच मुळे सगळीकडे चर्चेत आहेत. तसेच त्यानी क्वांटिको या मालिकेमध्ये काम करून अभूतपूर्व यश संपादन केले आहे. सध्या प्रियंका चोपडा जागतिक प्रसिद्धी प्राप्त झालेली अभिनेत्री ठरली आहे. प्रियंकाने तिच्या ट्विटर अकाउंटवरून चित्रपटाचे पहिले पोस्टर तिच्या चाहत्यांपर्यंत पाहोंचवले. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये त्यामध्ये फक्त दोन नाव राजा व गुड्डू अशी दर्शवली आहेत. मात्र राजा आणि गुड्डू यांचे चेहरे न धाखवता त्या ठिकाणी नारळ दिसत आहेत. या वेगळ्या प्रकारच्या पोस्टर चे रहस्य लवकरच आपल्या समोर येईल. तसेच या पोस्टर वर चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख घोषित केली आहे.

 

‘काय रे रास्कला’ या चित्रपटाचे दिग्दर्शन गिरीधरन स्वामी हे करत असून हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे.राजा आणि गुड्डू हे या चित्रपटात मुख्य पात्र आहेत . प्रियंका चोप्रा यांच्या पर्पल पेबल या प्रॉडक्शन हाउसअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती होणार आहे. ‘काय रे रास्कला’ हा कॉमेडी चित्रपट असून तो प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी त्यांना खात्री आहे.

 

Kay Re Rascala Poster

Leave a Reply

Your email address will not be published.