‘Karaar’ finally releases today..

करार हा चित्रपट आज प्रदराशीत होणार असून या आधी हा चित्रपट ६ जानेवारी रोजी प्रद्रीशीत होणार होता . पण आणखीही २ चित्रपट या दिवशी प्रदर्शित केले जाणार होते यामुळे करार सिनेमा पुढे ढकलण्यात आला.

सद्याच्या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी माणसांनी अक्षरशः वाहून घेतले आहे, त्यासाठी त्याने आपल्या भावनिक मूल्यांनादेखील मागे सोडले आहेत .यामुळे समाजाचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत चालला आहे. प्रेम आणि नातेसबंधांमध्येही याचं प्रमाणे व्यवहारिक व भावनाशून्य बनला आहेत. अशा या भावनाशुन्य समाजाचे व्यंग ‘करार’ या आगामी सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Karar 02

‘करार’ या सिनेमाचे दिग्दर्शन मनोज कोटियन यांनी केले असून ,क्रेक इंटरटेंटमेन्टच्या पूनम सिव्हिया आणि नीलम सिव्हिया यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या सिनेमात सुबोधसोबत उर्मिला कानेटकर आणि क्रांती रेडकर या अभिनेत्रीदेखील प्रमुख भूमिकेत आढळणार आहेत. सामाजिक संदेश लोकांपर्यंत पाहोचवण्यास नेहमी तत्पर असलेला सुबोध भावे ,तसेच उर्मिला कानेटकर , क्रांती रेडकर ,सुहासिनी मुळे आणि आरती मोरे हे कलाकार देखील पाहायला मिळणार आहेत.

करार या चित्रपटात आजच्या नव्या समाजात आपली विशेष ओळख बनवण्यासाठी स्वतःच्या पत्नीच्या भावनांचा जराही विचार न करणाऱ्या एका करारबद्ध तरुणांची कथा मांडली आहे. आयुष्याला प्रत्येक गोष्टीकडे ‘करार’ म्हणून पाहणाऱ्या या तरुणाच्या वैवाहिक आयुष्यातल्या उणीवा, आणि त्यातून भविष्यात उद्भवणा-या समस्या या चित्रपट दाखवल्या जाणार आहेत. मातृत्व मिळवण्यासाठी एका स्त्रीची होत असलेली तडफड आणि त्यासाठी केला जाणारा व्यवहार या सिनेमाचा महत्वाचा विषय असून भावनाशुन्य झालेल्या समाजाचे हे एक ज्वलंत उद्धरण ठरत आहे.

संजय जगताप यांनी या चित्रपटाचे लेखन केले असून या चित्रपटातील गाण्यांचे लेखन गाण्यांचे गुरु ठाकूर आणि मंगेश कांगणे यांनी केले आहे. तसेच या गाण्यांना अवधूत गुप्ते, श्रेया घोषाल, बेला शेंडे, सोनू कक्कर, जसराज जोशी, नेहा राजपाल आणि वैशाली सामंत अशा गायकांचा आवाज लाभले असून विजय गावंडे आणि परेश शाह यांनी संगीतदिग्दर्शक केले आहे .

आजच्या स्पर्धात्मक धावत्या जगात बदल चाललेली मातृत्वाबाद्दलची मानसिकता सांगणारा हा सिनेमा नक्की प्रेक्षकांना एक अविस्मरणीय आठवण देणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.