‘Kanika’ : horror story based revenge for Female Feticide!

Kanika Article 03

मराठी चित्रपट हे सामाजिक विषयावर आधारित असतात आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना दाखवून सामाज प्रबोधन केले जाते. कनिका या थरारक हॉररपटातून स्त्री भ्रूण हत्येच्या प्रश्नाचा वेध घेण्यात आला आहे. कनिका हा दिग्दर्शक पुष्कर मनोहर यांनी सादर केलेला एक वेगळा प्रयोग ठरणार आहे.

स्त्री भ्रूण हत्या हा एक फार गंभीर प्रश्न आहे. या विषयावर आजपर्यंत अनेक प्रकारे सामाजिक जागृती करणायचा प्रयत्न करूनही परिस्थितीत फारशी बदललेली नाही . स्त्री भ्रूण हत्येच्या घटना सातत्याने घडताना दिसतात. स्त्री भ्रूण हत्या या पार्श्वभूमीवर, कनिका हा हॉररपट आधारित आहे. या चित्रपटाची कथा आजच्या काळाशी सुसंगती असलेली आहे. मराठी चित्रपटांमध्ये या आधी अशी वेगळ्या धाटणीची कथा या पद्धीतीने दाखवण्यात आलेली नाही.शरद पोंक्षे, स्मिता शेवाळे, चैत्राली गुप्ते, कमलाकर सातपुते, आनंदा कारेकर, फाल्गुनी रजनी हे कलाकार या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. कनिका या चित्रपटाचे दिग्दर्शक पुष्कर मंनोहर असून त्यांनीच या चित्रपटाचे लेखन केलं आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात एकही गाणं नाही. सेव्हन वंडर्स मोशन पिक्चर्सच्या संदीप मनोहर यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून अमेय नारे यांनी संगीत दिले आहे . कुलदीप मेहन यांनी या चित्रपटाचं संकलन केलं आहे.

‘स्त्री भ्रूण हत्येचं गांभीर्य समाजाला कळलेलं नाही. कनिका या चित्रपटातून स्त्री भ्रूण हत्या हा विषय वेगळ्या दृष्टीकोनातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मराठीमध्ये प्रथमच हॉरर सूडकथा ही वेगळा प्रकार दिग्दर्शक पुष्कर मनोहर यांनी सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. तो प्रेक्षकांना नक्की आवडेल,अशी दिग्दर्शक पुष्कर मंनोहर याना खात्री आहे.
अभिनेता शरद पोंक्षे या चित्रपटाविषयी बोलताना म्हणाले,”मराठीतला पहिला हॉररपट म्हणून ‘कनिका’चं प्रेक्षकांपुढे येत आहे. मात्र, केवळ हॉररपटापुरता हा चित्रपट मर्यादित नाही. तर अत्यंत परखड आणि जबरदस्त असं सामाजिक भाष्य हा चित्रपट करतो. या चित्रपटात माझी प्रमुख भूमिका आहे. दिग्दर्शक पुष्कर मनोहर यांच्यासह काम करताना खूप मजा आली. चित्रपटाच्या उच्च निर्मिती मुल्यांसाठी त्यांनी काहीही कसूर केलेली नाही. अतिशय विचारपूर्वक हा चित्रपट साकारला आहे. डॉल्बी साऊंड, सिनेमास्कोप अशा उत्तम तंत्रज्ञानाचा वापर चित्रपटासाठी केला आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी हॉरर अनुभव चित्रपटगृहात जाऊनच घ्यावा”
‘कनिका’ हा हॉरर चित्रपट ३१ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.