Kailash Kher sings for Milind Shinde’s upcoming movie

Kailash Kher 01

 

‘हलगीचा टणकारा दुमदुम दुमतोया, ढोलाचा घुमारा घुमघुम घुमतोया’ हे कैलाश खेर यांच्या आवाजातील गाणं लवकरच तुमच्या भेटीसाठी आहे. गाण्याचे संगीत दिले आहे मंगेश धाकडे यांचे असून मिलिंद शिंदे यांनी हे गीत लिहिलं आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी हे गाणं गायलं आहे. या आगामी चित्रपटाचं नाव अजून जाहीर करण्यात आलेलं नाही मात्र या चित्रपटाचे दिग्दर्शक मिलिंद शिंदे हे आहेत. नुकतंच या गाण्याचा रेकॉर्डिंग करण्यात आलं. बऱ्याच काळानंतर कैलाश खेर यांनी मराठी चित्रपटासाठी गाणं गायलं आहे.

 

हा चित्रपट अॅथलेटिक्सवर आधारित असून बऱ्याच काळानं स्पोर्ट्स फिल्मची निर्मिती मराठीत होत आहे. राधे मोशन्स फिल्म्स या चित्रपटाचे निर्माते असून किरण बेरड यांनी चित्रपटाचं लेखन केले आहे. मंगेश धाकडे यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणे कोण गाणार यावर समुपर्ण टीम विचार करीत होती. या वेळी कैलाश खेर यांचं नाव समोर आलं. त्यांना हे गाणे पाठवलेगेले व ते ऐकून त्याने होकार दिला. कैलाश खेर यांच्या दमदार आवाजानं हे गाणं वेगळ्याच उंचीवर पोहोचलं असे गीतकार आणि दिग्दर्शक मिलिंद शिंदे यांचे मत आहे.

 

या गाण्याविषयी सांगताना कैलाश खेर यांनी सांगितलं कि या गाण्याचे शब्दच दमदार आहेत, व हे गाणं ऐकल्यानंतर ते त्यांना गावेसे वाटले. अस्सल मराठी मातीतलं हे गाणे नक्कीच ऐकणाऱ्याच्या मनाचा ठाव घेईल. बदलत्या मराठी संगीताविषयी कैलाश खेर सांगतात, महाराष्ट्राला मोठी सांगीतिक आणि साहित्य परंपरा आहे. मराठी संगीताला पूर्वीपासूनच एक प्रकारची उंची आहे. आताच्या काळात तयार होणारे संगीतही तीच परंपरा पुढे घेऊन जात आहे.