Hrithik Roshan gives Muhurat clap for upcoming Marathi Movie.

Smile Please 02

 

 

‘हृदयांतर’ या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर दिग्दर्शक विक्रम फडणीस घेऊन येत आहे ‘स्माईल प्लीज’ हा नवा चित्रपट. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त बॉलिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशन याच्या हस्ते पार पडला. या प्रसंगी मुक्ता बर्वे, ललित प्रभाकर, प्रसाद ओक, अदिती गोवित्रीकर, तृप्ती खामकर या कलाकारांनी चित्रपटातील त्यांच्या पात्रांची ओळख करून दिली. बॉलीवूड मधील अमिषा पटेल, झरीन खान, रॉनीत रॉय, किआरा अडवाणी, श्वेता बच्चन- नंदा अशा तसेच अन्य मराठी कलाकारांनी उपस्थित राहून चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.

 

 

Smile Please 01

 

 

‘स्माईल प्लीज’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू आणेल असे मत हृतिक रोशन याने यावेळी व्यक्त केले. ‘स्माईल प्लीज’ या चित्रपटाच्या नावावरूनच आयुष्य आनंदाने कसे जगावे या अश्याच हा चित्रपट असेल असा अंदाज आहे. ‘हृदयांतर’ या त्यांच्या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. आशय या उत्कृष्ट कलाकृतीनंतर पुन्हा एकदा विक्रम भावनाप्रधान चित्रपट प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने विक्रम आणि मुक्ता पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटातील कलाकारांची निवड पाहता या चित्रपटातही काहीतरी वैविध्यपूर्ण पाहायला मिळणार हे नक्की.

 

 

Smile Please 03

 

 

या चित्रपटाची निर्मिती हॅशटॅग फिल्म स्टुडिओच्या निशा शाह आणि क्रित्यावत प्रॉडक्शनच्या सानिका गांधी यांनी केली आहे. ‘स्माईल प्लीज’ या चित्रपटाचे संगीत रोहन- रोहन या जोडीने दिले असून. मंदार चोळकर यांनी या चित्रपटातील गाणी लिहिली आहेत. मिलिंद जोग हे या चित्रपटाचे छायाचित्रण करणार आहेत.