What happened when it suddenly started raining while shooting ‘Biscuit’

Biscuit the movie 03

 

लवकरच तुमच्या भेटीसाठी साठी येत आहे आगळा वेगळा चित्रपट बिस्कीट. प्रत्येक चित्रपटाच्या चित्रीकरण दरम्यान अनेकी किस्से घडत असतात. असच एक किस्सा बिस्कीट या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान एक मोठा किस्सा घडला. बिस्कीट या चित्रपटाचे शूटिंग जुन्नर जवळ खिरेश्वर गावात डोंगराच्या पायथ्याशी सुरु होते. एप्रिल महिन्यात सहसा पाऊस पडत नाही त्यामुळे एका दृश्याचे चित्रीकरण सुरु होते . हे चित्रीकरण सकाळी आठ वाजल्यापासून सुरु होतं, आणि शूटिंग चे लोकेशन हे डोंगर पायथ्याशी होते. ते असे ठिकाण होते जिकडे वस्ती नव्हती. अचानक जोरदार पाउस सुरु झाला आणि संपूर्ण टीमची तारांबळ उडाली. कलाकार आणि तंत्रज्ञ हे मिळेल तिथे आसरा शोधू लागले. पण मुख्य कलाकरांना नेमकी कुठेच जागा मिळाली नाही. जवळच एक जनावरांचा गोठा होता, तिथेच चित्रपटाच्या टीमने मोर्चा वळवला. एकतर जागा खूप छोटी होती, त्यात पाऊस सलग आठ ते नऊ तास थांबला नाही. जेवणापासून सगळ्याच गोष्टीची अडचण झाली. परंतु सर्व कलाकरांनी गैरसायीची तमा न बाळगता गोठयात पूर्ण वेळ काढला आणि पाऊस बंद झाल्यावर पुन्हा त्याच जोमाने कामाला सुरुवात केली.

 

Biscuit the movie 02

 

प्रत्येक चित्रपटात एक कहाणी लपलेली असते त्या गोष्टीच्या अवती भोवती चित्रपटाचे कथानक गुंफले जाते. बिस्किट हा चित्रपट कोमल मनाच्या लहानग्यांच्या आयुष्यात येणाऱ्या प्रश्नांचा वेध घेणारा त्यांना पडणाऱ्या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेतांना ज्या काही गोष्टीत होतात त्या प्रेक्षकांसमोर मांडणार आहे. बिस्किट हा चित्रपट एक्सपांशन फिल्म्स प्रा.लि.निर्मिती संस्थे अंतर्गत बनवला गेला आहे तसेच पद्मश्री शेवाळे हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. रवींद्र शेवाळे हे या चित्रपटाचे दिग्दर्शिक असून शशांक शेंडे, पूजा नायक, अशोक समर्थ, दिवेश मेडघे या कालाकारांच्या महत्तवपूर्ण भूमिका आहेत.पद्मश्री शेवाळे यांची ही पहिलीच चित्रपटनिर्मिती आहे. कथा आणि संकल्पना देखील त्यांचीच आहे. सुप्रसिद्ध पटकथा लेखक सचिन दरेकर यांनी सिनेमाची पटकथा लिहिली असून, सवांद नामदेव मुरकुटे यांचे आहे. डोळ्याची पारणे फेडावीत अशी दृश्य किशोर राउत यांनी त्यांच्या सिनेमाटोग्राफीतून दाखवली आहेत. चैतन्य अडकर यांनी या चित्रपटाचे संगीत तयार केले आहे. बिस्किट २४ नोव्हेंबर २०१७ पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.