‘H2O :Kahani Thembachi’ upcoming movie releasing on 12 April.

H2O

 

समस्त मानव जाती साठी अन्न, वस्त्र आणि निवारा या जीवनावश्यक गरजा आहते. आणि याच्या बरोबरो जिवंत राहण्यासाठी सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे पाणी.आपल्या आयुष्यात पाण्याला अनन्यसाधारण महत्व आहे. पाणी म्हणजेच जीवन असे हि आपण म्हणतो. पाण्याला वैद्यानिक भाषेत H2O असं म्हणतात. याचा हटके नावाचा चित्रपट लवकरच अप्लाय समोर येत आहे.

 

H2O असं हटके आणि वेगळं या आगम चित्रपटाचे नाव असून नुकताच या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं. या पोस्टरमध्ये कोरडी जमिनी आणि तिला गेलेले तडे आपण पाहू शकतो. तसेच या जमिनीवर पाण्याचे काही थेंबही सांडल्याचं दाखवले गेले आहेत. चित्रपटाच्या अश्या पोस्टर वरून हा चित्रपट दुष्काळावर भाष्य करणार असल्याचं अंदाज लावता येत आहे.

 

दुष्काळा हा प्रमुख विषय असून या सोबतच आणखी एक विषय या चित्रपटात असू शकतो. चित्रपटाचे पोस्टर नीट पाहता आपण दोन व्यक्तींचे पायही दिसून येत आहेत एकाच्या पायात चप्पल तर दुसऱ्या व्यक्तीच्या पायात बूट दिसून येत आहे. यावरून या दोन व्यक्तींमधील परिस्थिती देखील या चित्रपटाचा महत्तवपूर्ण विषय असेल असे म्हणे चुकिचे ठरणार नाही.

 

कहाणी थेंबाची अशी या चित्रपटाची टॅगलाईन असून या चित्रपटाचं दिग्दर्शन मिलिंद पाटील यांनी केलं आहे. H2O या चित्रपटाची निर्मिती सुनिल म. झवर यांनी केली आहे. या चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांची माहिती अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. मात्र या भूमिकांवरील पडदाही लवकरच दूर सारण्यात येईल, असं सांगण्यात येत आहे. H2O हा चित्रपट येत्या १२ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.