Get ready to enjoy Sachin Kundalkar’s ‘Gulabjaam’

गुलाबजाम हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येत आहे. नावाप्रमाणेच हा चित्रपट गोड असणार यात काही शंका नाही. गुलाबजाम या चित्रपटाची कथा काय असेल ह्याची उत्सुकता आपल्याला प्रोमोज पाहून झाली असेलच नावाप्रमाणेच हा चित्रपट आपल्याला खवैयेगिरी करायला भाग पडेल असे वाटते. ह्या चित्रपटाचे दिगदशक सचिन कुंडलकर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी जिने ह्या चित्रपटातील मुख्य पात्र राधा रंगवले आहे आणि सोबत सिद्धार्थ चांदेकर ज्याने चित्रपटात आदित्यची भूमिका केली आहे ह्या तिघांनी लोकसत्ताच्या कार्यालयाला नुकतीच भेट दिली. सचिन कुंडलकर हे नेहमीच वेगळ्या धाटणीचे चित्रपट प्रेक्षकांना देत असतात त्यामुळेच ह्या चित्रपटात पण आपल्याला वेगळा काहीतरी पाहायला मिळेल याची दाट शक्यता आहे. ह्या चित्रपटात नात्यांचा संबंध पदार्थांच्या गोड, तिखट ,आंबट अशा चवींमधून त्यांनी व्यक्त केला असावा. ह्याच आणि अशा सगळ्या प्रस्नाची उत्तरे त्यांनी लोकसत्ता च्या कार्यालयात दिली. मराठी चितपटांसाठी सध्या चांगला काळ आला आहे.

Gulabjaam Movie Party 01

 

सचिन कुंडलकर हे सांगतात कि एखाद्या गोष्टीसाठी व्यक्त होण्यासाठी सगळ्यात चांगले माध्यम म्हणजे सिनेमा आणि मराठी सिनेमा हा प्रेक्षकांच्या भावनांना चांगलेच ओळखतो त्यामुळे मराठी कलाकारांवर प्रेक्षक मनापासून प्रेम करतात हिंदी चित्रपटांप्रमाणे फक्त आर्थिक गणिते लाखात घेऊन हे चित्रपट बनविले जात नाही.आपल्याला रोज प्रेमाने खाऊ घालणाऱ्या व्यक्तीलाहि आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे त्यासाठीच त्यांनी हा सिनेमा बनवला आहे. आपण आपली खाद्य संस्कृती जपली पाहिजे तिला वाढवले पाहिजे महाराष्ट्राला खूप मोठी खाद्यसंस्कृती आहे ती खूप जुनी आहे आपल्याया त्याचा अभिमान असला पाहिजे आणि आपण तीचा सगळीकडे प्रसार करायला पाहिजे असे त्यांना वाटते. त्यासाठीच ह्या चितपतच त्यांनी आधार घेतला आहे .

 

Gulabjaam Movie Party 06

 

संस्कृती हि वाहत्या पाणयासारखी असते ती कधीही लयाला जात नाही त्यामुळे आपण लोकांना मराठीच बोला किंवा मराठी पाट्या दुकानावर लावा म्हणून जबरदस्ती करू शकत नाही त्याऐवजी आपण त्यांना संस्कृती उलगडून दाखवू शकतो. ह्या चित्रपटाची कथा थोडक्यात सांगितली आहे. लंडनमध्ये राहणार मराठमोळा आदित्य महाराष्ट्रात येतो त्याला लंडनमध्ये महाराष्ट्रीयन रेस्टोरंट उघडायचे असते त्यासाठी तोपुण्यात येतो. चांगल्या जेवण येणाऱ्या व्यक्तीला शोधात असतो तेव्हा त्याची उत्तम जेवण बनवणाऱ्या राधाशी भेट होते. राधा आदित्य आणि जेवण या भोवती हि कथा गुंफली आहे. सोनालीचे खाद्य प्रेम आणि आवड ह्यामुळे राधाच्या भूमिकेसाठी तिची निवड अगोदरच झाली होती. आणि सिद्धार्थ बरोबर वजनदार ह्या चित्रपटात काम केल्यामुळे त्याच्या अभिनयाची भुरळ पडली होती त्यामुळे आदित्यच्या व्यक्तिरेखेसाठी त्याची निवड केली असे त्यांनी सांगितले.