‘Faster Fene’ promotion videos going viral on social media

Fafe 01

 

मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर मराठी कलाकार ‘फ’ ची बाराखडी म्हणताना दिसत आहेत. अचानक हा फ’च्या बाराखडीचा ट्रेंड का आला असा प्रश्न तुम्हा नक्कीच पडला असणार. तर याचा कारण म्हणजे अमेय वाघ ची प्रमुख भूमिका असलेला आगामी चित्रपट ‘फास्टर फेणे’. ‘फास्टर फेणे’ या आगामी मराठी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हा आगळावेगळा फंडा वापरण्यात येतोय. हा चित्रपटाचे निर्माते रितेश देशमुख व जेनेलिया देशमुख हे आहेत.

 

रितेश देशमुख, मिथिला पालकर, स्वानंदी टिकेकर, सुव्रत जोशी, सखी गोखले, अमृता खानविलकर , अभिनय बेर्डे , प्रिया बापट , साई ताम्हणकर, स्पृहा जोशी , पुष्कराज चिरपुटकर अशा अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर ‘फ’ ची बाराखडी म्हणतानाचा व्हिडिओ पोस्ट केले आहेत.

 

‘फास्टर फेणे’ हा चित्रपट भा.रा.भागवत यांच्या ‘फास्टर फेणे’ या पुस्तकावर आधारित आहे आणि आदित्य सरपोतदार हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत तर क्षितीज पटवर्धन यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे. बालसाहित्यिक, कादंबरीकार, लेखक आणि पत्रकार असलेल्या भास्कर रामचंद्र भागवत यांनी लिहिलेलं हे पात्र ६०च्या दशकात तुफान लोकप्रिय झालं होतं. बनेश उर्फ फास्टर फेणे, त्याची शिडशिडीत अंगकाठी, त्याच्या फुरसुंगीच्या करामती, त्याचं ते सायकल चालवणं ते अगदी चिन्यांना दिलेली धडक अशा एकापेक्षा एक रंजक कथांनी त्यावेळी अनेक लहानग्यांचं जग व्यापलं होतं. अर्थात आता त्यावर येणारा चित्रपटही तितकाच खुसखुशीत असेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

 

पाहा कलाकारांचे व्हिडिओ-