‘Farjad’ upcoming movie based on historical events

Farjad 03

 

इतिहासाच्या पानांत लुप्त झालेल्या अनेक महान व्यक्तिरेखांवर बेतलेले चित्रपट अलीकडच्या काळात आले आणि त्याला उदंड लोकाश्रयही मिळाला. याच यादीत आणखी एका चित्रपटाचा आपल्याला उल्लेख करावा लागणार आहे. कोंडाजी फर्जंद हा मराठा साम्राज्याच्या इतिहासातील ज्वलंत अध्याय आता मराठी रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे. शिवरायांच्या गड-किल्ल्यांवर पराक्रम गाजविलेल्या अनेक पराक्रमी योद्ध्यांपैकी कोंडाजी फर्जंद हे एक. काळाच्या ओघात विस्मरणात गेलेल्या या योद्ध्याच्या पराक्रमाची यशोगाथा फर्जंद या चित्रपटाच्या रूपातून आपल्या समोर येणार आहे.

 

कोंडाजी फर्जंद हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक शिलेदार होता. त्याने फक्त ६० मावळ्यांनिशी पन्हाळा किल्ला एका रात्रीतून जिंकला होता. त्याला शिवाजी महाराजांनी ८ हजार फौज दिली होती. त्यापैकी त्याने जे किल्ल्याच्या तटबंदीवर चढू शकतील असे फक्त ६० मावळे घेतले व किल्ल्यावर चढून किल्लेदाराला जिवंत ताब्यात घेतला. त्याच्या मानेवर तलवार ठेऊन त्याने तेथील इतर सैनिकांना शरण येण्यास सांगितले. अशा प्रकारे त्याने किल्ला सर केला.

 

Farjad 02

 

कोंडाजी फर्जंद आणि मावळ्यांनी किल्ले पन्हाळ्यावर यशस्वी चढाई केली होती या धाडसाची गाथा, दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘फर्जंद’ या चित्रपटात आपण पाहणार आहोत. या चित्रपटामुळे तुम्हाला पुन्हा एकदा इतिहासाचे साक्षीदार होण्याची संधी मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची पहिली झलक इतिहासकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली होती.

 

फर्जंद हा चित्रपट ११ मे २०१८ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘अशा वीरांच्या चरित्रांमधून राष्ट्रीय चारित्र्य घडतं., म्हणून असे चित्रपट महत्त्वाचे आहेत’, असं शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे याने म्हटले तसेच या प्रकाच्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांची इतिहासाबद्दलची जिज्ञासा आणि ज्ञान वाढते असे मत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केला. फर्जंद या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता आहेत ‘स्वामी समर्थ मुव्हीज’ . या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. दिग्पाल लांजेकर यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. तसेच अनिरबान सरकार, संदीप जाधव, महेश जाऊरकर, स्वप्नील पोतदार हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.