‘Ek Hota Pani’ a film based on water crisis in Maharashtra.

‘एक होतं पाणी’ अश्या हटके नावाचा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीसाठी येत आहे. नुकताच या चित्रपटाचा टिझर रिलीज करण्यात आला , ज्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. चैत्रा भुजबळ हा या चित्रपटातील बाल कलाकार असून त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी चित्रपटाचा टिझर रिलीज करण्यात आला.आज पाणी हा आपल्या समोर असलेला खूप मोठा प्रश्ण असून समाजाला या विषयी जागरूक राहणे अत्यंत गरजेचे आहे. व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज, प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ, विजय तिवारी यांची निर्मिती असेलेला ‘एक होतं पाणी’ हा चित्रपट रोहन सातघरे यांनी दिग्दर्शित केला आहे.

 

EK hota Pani 01

 

अंबरनाथ चित्रपट महोत्सवा मध्ये ‘एक होतं पाणी’ या चित्रपटाने ६ नामांकनं मिळवली . ज्यामधे २ पुरस्कारांवर म्हणजेच ‘सर्वोत्कृष्ट कथा-आशिष निनगुरकर’ आणि ‘सर्वोत्कृष्ट बालकलाकार चैत्रा भुजबळ’ .या प्रमाणे नोएडा येथे संपन्न झालेल्या 6 व्या नोएडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये “दखलपात्र ज्युरी पुरस्कार” मिळाला.’एक होत पाणी’ हा चित्रपट रसिक प्रेक्षकांना नक्की आवडेल असे या चित्रपटाच्या टीम चे मत आहे. आशिष निनगुरकर यांच्या लेखणीतून साकारलेला हा विषय समाजाच्या डोळ्यांत जळजळीत अंजन घालणारा असून सद्यस्थितीला धरून आहे.

 

‘एक होतं पाणी’ या चित्रपटात हंसराज जगताप, उपेंद्र दाते, अनंत जोग, जयराज नायर, गणेश मयेकर, रणजित जोग, श्रिया मस्तेकर, रणजित कांबळे, त्रिशा पाटील, शीतल कल्हापुरे, शीतल शिंगारे, आनंद वाघ, नाना शिंदे, अनुराधा भावसार, डॉ राजू पाटोदकर, राधाकृष्ण कराळे, दिपज्योती नाईक, बालकलाकार चैत्रा भुजबळ या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘एक होतं पाणी’ या चित्रपटाचे छायाचित्रण योगेश अंधारे यांनी केले असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

एका दुष्काळग्रस्त गावाची गोष्ट सांगणारा ‘एक होतं पाणी’ या चित्रपटाचा टीझर :