Dhondi Champya upcoming movie Muhurat held in Mumbai.

“धोंडी चम्प्या एक प्रेम कथा” या आगामी मराठी चित्रपटाचा मुहूर्त सोहळा नुकताच संपन्न झाला. या वेळी चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती . तसेच अभिनेता भरत जाधव, वैभव मांगले, निखिल चव्हाण, सायली पाटील यांनी देखील उपस्थित राहून हा कार्यक्रम सुशिभित केला. या चित्रपटाची निर्मिती सुनील जैन, आदित्य जोशी, अलोक अरबिंद ठाकूर, आदित्य शास्त्री, वेनेसा रॉय यांच्या सहकार्याने होणार आहे. चित्रपटाचे सादरीकरण सुनील जैन , रमेश अगरवाल, कल्ट एंटरटेन्मेन्ट, फीफथ डायमेन्शन , व राजतरु स्टुडिओ करत आहेत.

 

dhondichampya 02

उमाजी व अंकुश या चित्रपटातील दोन प्रमुख व्यकीतीरेखा असून चित्रपटाचे कथानक यांच्यातील वादावर आधारीत आहे. एकाच गावात राहणारे बागायतदार उमाजी आणि अंकुश यांच्यात परंपरागत चालत आलेलं वैर… त्यामुळे एकमेकांविषयी तिरस्कार … आणि अश्या परिथिती उमाजीचा मुलगा आदित्य आणि अंकुशची मुलगी ओवी यांच्या मधे निर्माण झालेलं प्रेम…आणि यांनतर सुरु होतो दोन प्रेमात पडलेल्या मुलांचे धोंडी आणि चम्प्याला भेटवायचे प्रयत्न… हे सगळे होत असताना होणार गोंधळ हा प्रेक्षकांसाठी एक विनोदी मेजवानी ठरणार आहे.

 

dhondichampya 03

 

“धोंडी चम्प्या एक प्रेम कथा” या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन ज्ञानेश शशिकांत भालेकर हे करत असून या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन सौरभ – दुर्गेश करीत आहेत. चित्रपटाच्या छायाचित्रणाची जवाबदारी राजेश नदोने यांनी घेतली असून सुप्रसिद्ध कवी गुरू ठाकूर व मंदार चोळकर या चित्रपटाचे गीतकार असणार आहेत. शिवराज छाब्रा हे या चित्रपटाचे ध्वनी दिग्दर्शन करीत आहेत.