‘Deva’ movie team used this unique way for promotion

Deva movie Promotion 01

साध्य मराठी चित्रपटात प्रमोशन करण्याचे निरनिराळे फंडे वापरले जात आहेत. टी वि वर दाखवल्या मालिकांमध्ये येऊन चित्रपटाची टीम प्रोमोशन करताना दिसतात. अंकुश चौधरी स्टारर देवा या आगामी मराठी चित्रपटाच्या टीमने प्रोमोशन साठी एक वेगळा फंड निवडला आहे. खूप मोठा गाजावाजा न करता शांततेत देवा या सिनेमाचे जोरदार प्रमोशन सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. पण शांततेत जोरदार प्रमोशन आणि ते कसा काय हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असणार. महाराष्ट्राच्या २००हून अधिक ए.टी.एम. मध्ये या चित्रपटचा टीझर दाखविला जात आहे.देवा चित्रपटाच्या टीमने हि भन्नाट कल्पना शोधली असून २० सेकंदाचा हा टीझर आपली कमाल नक्कीच करताना दिसत आहे.

या आगळ्यावेगळ्या प्रयोगामुळे देवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. विशेष म्हणजे, ए.टी.एम.द्वारे अशाप्रकारे सिनेमाचा टीझर दाखवण्याची हि पहिलीच वेळ असून,ह्या अतरंगी संकल्पनेचे कौतुकदेखील होताना दिसत आहे.आपल्या अभिनयाबरोबरच भूमिकेतदेखील नाविण्यपण जपणाऱ्या अंकुश चौधरीची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचा अशी होत असलेली प्रसिद्धी,प्रसारमाध्यमांत चर्चेचा विषय ठरत आहे.

 

Deva movie Promotion 02

साऊथचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक मुरली चार्ली या मल्याळम चित्रपटाचा देवा हा मराठी रिमेक आहे. या चित्रपटात अंकुश चौधरी देवा या मुख्य भूमिकेत पहायला मिळणार आहे. साऊथचा हा चित्रपटात मराठीत करायचा हा विचार घेऊन आलेले दिग्दर्शक मुरली यांना कोकणाच्या सौंदर्याने भुरळ घातली असावी त्यामुळे या चित्रपटाचे चित्रीकरण त्यांनी कोकणातील नयनरम्य स्थळांवर केले आहे. त्यामुळे देवा हा चित्रपट बघतान कोकणाचे निसर्गसौदऱ्य पाहताना प्रेक्षक हि कोकणच्या प्रेमात पाडेल यांत शंका नाही. देवा हा चित्रपट साऊथचा रिमेक असला तरी तो मराठमोळ्या पद्धतीने दाखविण्याचा दिग्दर्शकांचा प्रयत्न आहे. देवा या मुख्य पात्राभोवती संपुर्ण चित्रपटाची कथा आधारित आहे. या चित्रपटामध्ये देवाचा म्हणजेच अंकुशचा प्रवास दाखविण्यात आला असून हा चित्रपट १ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होत आहे.डॉ. मोहन आगाशे,वैभव मांगले,पंढरीनाथ कांबळे, मयूर पवार या कलाकारांच्याही या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहेत.