Bollywood music directors Salim Sulaiman to debut in this Marathi Movie.

बॉलीवूडमधील अनेक दिग्गज गायक आणि संगीतकारांनी आपल्या कलागुणांनाच ठसा मराठी चित्रपटात उमटवली आहे. इतकाच नाही तर त्यांच्या आवाजातील मराठी गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. लवकरच हिंदी चित्रपटसृष्टीतील आणखी एक आघाडीची संगीतकार जोडी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करतेय. हि जोडी म्हणजे गायक-संगीतकार सलीम-सुलेमान मर्चंट या दोघांची . या दोघांचीही आपली एक खास ओळख आहे तसेच या जोडीने हिंदी चित्रपटांसाठी गायक-संगीतकार म्हणून काम केले आहे. हे दोघे आता मराठी चित्रपटात संगीतकार म्हणून पदार्पण करीत आहे. शशांक उदापूरकर दिग्दर्शित ‘प्रवास’ या आगामी मराठी चित्रपटात त्यांच्या संगीताची जादू अनुभवता येणार आहे.

 

SS 02

 

सलीम- सुलेमान यांनी अनेक चित्रपटात त्यांच्या संगीताची जादू दाखवली आहे. त्यांचे काही गाजलेले चित्रपट ‘चक दे इंडिया’, ‘अब तक छप्पन’, दोस्ताना’, ‘धूम २’ , ‘फॅशन’ , ‘सिंग इज किंग’ ‘मुझसे शादी करोगी’, ‘आजा नचले’ ‘इक्बाल’ ‘हम तुम’. या नंतर ते आता मराठीतही आपला जलवा दाखवायला ते सज्ज झाले आहेत.

 

‘प्रवास’ या चित्रपटातील गाण्याच्या निमित्ताने संगीतकार सलीम- सुलेमान, गायक सोनू निगम आणि गीतकार गुरु ठाकूर हे कलेच्या प्रांतातील तीन गुणी कलावंत एकत्र आले आहेत.नुकतंच या गाण्याचं रेकोर्डिंग संपन्न झाले आहे. ‘प्रवास’ बद्दल बोलताना सलीम- सुलेमान सांगतात की, आमच्यासाठी खूपच वेगळा अनुभव होता. या निमित्ताने आम्ही मराठी चाहत्यांसाठी गीत-संगीताची अनोखी पर्वणी देऊ शकलो याचा आम्हाला आनंद आहे. ओम छंगानी फिल्म्स निर्मित ‘प्रवास’ या चित्रपटाच्या लेखनाची व दिग्दर्शनाची जबाबदारी शशांक उदापूरकर यांनी सांभाळली आहे. छायांकन सुरेश देशमाने यांचे आहे.